बिग बॉसच्‍या घरामध्‍ये बंदिस्‍त असलेले उमेदवार पुन्‍हा एकदा त्‍यांच्‍या आनंदी व भितीप्रद क्षणांना उजाळा देताना दिसून आले. वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या नुकत्‍याच एका क्लिपमध्‍ये बिग बॉसच्‍या घरामध्‍ये हल्‍लीच प्रवेश मिळालेली नवीन पाहुणी शिवानी सुर्वे तिला अंधाराची आणि भूतांची भिती वाटत असल्‍याचे सांगताना दिसून आली. 
 
''तुला आयुष्‍यात कुणाची गरज पडली आहे का? म्‍हणजे एकटी रहावं लागलं तर राहू शकतेस?'' हिनाने उत्‍सुकतेने हा प्रश्‍न शिवानीला विचारला आणि ती म्‍हणाली, ''मी एकटी राहूच शकत नाही, कधीच नाही. मी एक दिवस पण एकटी नाही राहिली आहे अजून पर्यंत.'' 
 
शिवानी पुढे म्‍हणाली, ''मला भिती वाटते भूताची! मला असं वाटतं की तिकडनं कुणीतरी येणार, माझी जाम फाटते. नशिब मी भूत टास्‍कच्‍या वेळी नव्‍हते इथे नाहीतर ते बघूनच मला भिती वाटली असती, थरथरली असती मी. मला माहित आहे हे सगळं नॉन सेन्‍स आहे पण वाटते मला भिती.'' 
 
तेव्‍हा नेहा तिची मस्‍करी करत म्‍हणते की, भूत टास्कच्या वेळी शिवानीला घाबरवण्‍यासाठी तिने भूतासारखा पेहराव करुन तिला घाबरवलं असतं.

त्‍यावर ती म्‍हणते, ''इइइ.. मी तुला सांगितलं असतं तू जा माझ्याकडून लांब. मला कुणी विचारलं तुला कसली भिती वाटते तर माझं उत्‍तर हेच की 'मला भूताची भिती वाटते.'' 

ती पुढे म्‍हणते, ''लाईट गेल्‍यावर तर मी रडू शकते जोरजोरात, की लाईट लावा आधी मला बाहेर काढा. बाकी काही फरक पडत नाही मला, माझा विश्‍वासाचा माणूस हवा माझ्याबरोबर अंधारात मग मी चिल'' त्‍यानंतर ती तिच्‍यासोबत घडलेला एक प्रसंग सांगू लागते, ''आता मध्‍ये खूप पाऊस पडत होता तेव्‍हा लाईट गेली होती माझ्या घराची, आणि तेव्‍हा नेमकं घरात कुणी नव्‍हतं. बस झोपायला गेली मी आणि लाईट गेली, मी जी जीव घेऊन बाहेर पळाली आहे बेडरुममधून डायरेक्‍ट ग्राऊंड फ्लोअरला. लाईट येईपर्यंत मी खालीच बसणार!' 


 घरातील गुपिते जाणून घेण्‍यासाठी पहात रहा, वूटचे 'अनसीन अनदेखा'.


Web Title: Bigg Boss Marathi 2: This member scared about ghosts and light off
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.