'बिग बॉस मराठी'चा प्रेक्षकांमधील उत्‍साह वाढत असताना हा शो शिवानी सुर्वेच्‍या घरातून बाहेर जाण्‍यासह अधिक रोचक बनला आहे. त्‍यानंतर घरातील मंडळींनी 'बिग बॉस' घरातील नवीन व पहिली वाइल्‍ड कार्ड प्रवेशक हिना पांचाळचे स्‍वागत केले. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये हिना घरातील मंडळींना तिच्‍या बालपणीच्‍या आठवणी सांगताना दिसत आहे.

किशोरी शहाणे, पराग कान्‍हेरे व अभिजीत बिचुकले हे घरात प्रवेश केल्‍यानंतर हिना पांचाळसोबत गप्‍पागोष्‍टी करत आहेत. हिना शेफ परागने केलेले जेवण खाण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करत असताना किशोरी म्‍हणते, ''तू गुजराती असूनही मराठी छान बोलतेस!'' याबाबत हिना प्रतिक्रिया देते, ''माझं लहानपण ठाण्‍यात झालं आहे, माझी शाळा पण तिथेच झाली आहे आणि माझ्याशी तिथे सगळे मराठीमध्‍येच बोलायचे.'' 


ती पुढे म्‍हणते, ''मी लहानपणापासूनच खूप टॉम बॉय होती पण आता हळूहळू डान्‍स शुरू केल्‍यापासून मुलींसारखी राहायला लागली. आधी तर मी बाइक चालवायची, खूप अपघातही झाले आहेत.''
उत्‍सुक होत परागने हिनाला तिच्‍या नृत्‍याबाबत विचारले त्यावर ती म्‍हणाली, ''शिकली नाही आहे कुठे मी. ते बिल्डिंगमध्‍ये डान्‍स करणं, थर्टी फर्स्‍ट पार्टीमध्‍ये डान्‍स करणं असं होतं माझं. मग गणेश आचार्यच्‍या ग्रुपमध्‍ये बॅक डान्‍सर झाले. डान्सिंग माझी हॉबी होती, जी पॅशनमध्‍ये कन्‍व्‍हर्ट झाली आणि पॅशन प्रोफेशन झालं आहे आता.''


हिना आणखी सांगते की, तिला महिला उद्योजक बनायचे होते. ती पुढे म्हणाली की, ''मला आधी बिझनेस वुमन व्‍हायचं होतं पण पप्‍पाचा बिझनेस कोलॅप्‍स झाला, त्‍यानंतर मी या फिल्‍डमध्‍ये आले. आधी तर मला काही करायची गरज नव्‍हती मला सगळं माझे पप्‍पा द्यायचे, मला तर कधीच वाटलं नव्‍हतं की माझ्यावर कधी रिस्‍पॉन्सिबिलिटी येणार फॅमिलीची. भावा आणि बहिणीचा अभ्‍यास अशा या सगळ्या रिस्‍पॉन्सिबिलिटीज घेऊन आता ११ वर्ष झाले  मला माझ्या फॅमिलीच्‍या फेसवर ती हॅप्‍पी स्‍माइल बघायची आहे.''


Web Title: Bigg Boss Marathi 2: this member of Bigg Boss House took responsibility of family
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.