बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य रंगत आहे आणि याच टास्क दरम्यान एकमेकांच्या टीमला हरविण्यासाठी सदस्य बऱ्याच योजन आखताना दिसत आहेत. काल बिग बॉसनी सांगितल्याप्रमाणे आता प्रत्येक टीम त्यांना पटेल त्याप्रमाणे योजना आखून दुसऱ्या टीमला मात देण्याच्या प्रयत्नात आहेत. 

प्रत्येक टीमने दुसऱ्या टीमच्या मॅनेजरकडून त्या टीमने तयार केलेले कपडे मंजूर करून घ्यायचे आहे. हेच लक्षात घेता धुतलेले कपडे वाळवल्यानंतर त्याला इस्त्री करून तयार करायचे आहेत आणि हेच लक्षात घेता शिवने विरोधी टीमची इस्त्री चोरणार आहे. आता ही इस्त्री ते कसे परत मिळवतील ? बळाचा वापर करून कि युक्तीचा वापर करू हे प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये कळेलच.


तसेच नेहाचे असे म्हणणे असणार आहे विरोधी टीमचा मॅनेजर नसल्याने आमच्या टीमला विजेती टीम म्हणून घोषित करा... तर शिवने ही संधी देखील न दवडता त्याला उत्तर दिले “तुम्ही खेळू नका” तर यावर नेहाने देखील उत्तर दिले “टीम ब्रेकर” आता हे नक्की कोणासाठी होते ?


बिग बॉस मराठीच्या घरात सुरु असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यामध्ये बरीच भांडण, वाद- विवाद, आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. बिग बॉस यांनी विरोधी टीमला या टास्कमध्ये हरविण्यासाठी साम, दाम दंड, भेद याचा उपयोग चातुर्याने करायला सांगितले. तसेच टास्कमध्ये दिलेली ऑर्डर एकाच टीमने पूर्ण करायची आहे हे देखील सांगितले आहे.

बिग बॉसने हे सांगितल्यानंतर काल परागने स्वत:लाच मॅनेजर बनवले आणि त्यामुळे दोन्ही टीममध्ये वादाची ठिणगी उडली.


या टास्कमध्ये मॅनेजरमध्ये झालेल्या डील प्रमाणे विणाच्या टीमने परागच्या टीमला २ कपडे द्यायचे आहेत. परंतु विणाच्या टीमने यावर उत्तम योजना आखली आहे. विणाची टीम परागला सांगणार आहे आमच्या टीमचा मॅनेजर सुट्टीवर आहे आणि यावरूनच विणा–परागमध्ये वाद होणार आहे.


Web Title: Bigg Boss Marathi 2: Iron Theif in 'Bigg Boss' house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.