ठळक मुद्देहिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे.

बिग बॉस मराठी 2’ मध्ये काल शनिवारी अभिनेत्री आणि आयटम गर्ल हिना पांचाळ हिची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. वीकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी फर्स्ट वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून हिनाचे नाव जाहिर केले आणि हिनाची स्टेजवर धमाकेदार एन्टी झाली. गत आठवडाभर शिवानी सुर्वेने मला घराबाहेर जायचे आहे, असा तगादा लावला होता. बिग बॉसच्या घरात मानसिक त्रास होत असल्याची शिवानीने तक्रार होती.  अखेर महेश मांजरेकरांनी तिला बॅग भरुन यायला सांगितले आणि शिवानी घराबाहेर गेली. ती बाहेर गेली आणि हिनाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली.


हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.

मलायका जितकी हॉट आणि बोल्ड आहे, तितकीच हिनाही हॉट आणि बोल्ड आहे. एका इव्हेंटमध्ये हिना व मलायका एकमेकांसमोर आल्या होत्या. हिनाला पाहून स्वत: मलायकाही अवाक् झाली होती.


हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटाच्या यादीत हिनाचा  समावेश होता. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

बिग बॉसचा सीझन सुरू होताच दुस?्याच आठवड्यात ग्रुप बनण्यास सुरुवात झाली होती. किशोरी शहाणे, वीणा जगताप, रुपाली भोसले या तिघींमध्ये केव्हीआर ग्रुप बनवला.  


Web Title: bigg boss marathi 2 heena panchal is the first wild card entry in the house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.