ठळक मुद्देमी घरात जाण्याच्याआधीच माझ्या हेल्थ प्रोब्लेमविषयी बिग बॉस मराठीच्या टीमला कल्पना दिली होती आणि ते देखील मी घरात असताना जमेल तितकी मला मदत करत होते. पण घरात घडलेल्या काही घटनांमुळे मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे माझी तब्येत अधिक बिघडत होती. 

शिवानी सुर्वेला पहिल्या दिवसापासून बिग बॉस मराठी २ च्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण प्रेक्षकांची लाडकी शिवानी नुकतीच बिग बॉसच्या घरातून बाहेर आली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यासाठी ती गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत होती. अखेरीस तिला बिग बॉसने घरातून बाहेर जाण्याची परवानगी दिली.

बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमामुळे शिवानीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग मिळालेले असून देखील तिने या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. यावर लोकमतशी बोलताना शिवानीने सांगितले, माझे काही हेल्थ इश्शू असल्याने घराच्या बाहेर पडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मी घरात जाण्याच्याआधीच माझ्या हेल्थ प्रोब्लेमविषयी बिग बॉस मराठीच्या टीमला कल्पना दिली होती आणि ते देखील मी घरात असताना जमेल तितकी मला मदत करत होते. पण घरात घडलेल्या काही घटनांमुळे मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे माझी तब्येत अधिक बिघडत होती. 

बिग बॉस मराठी २ मधील पराग कान्हेरे, किशोरी शहाणे आणि वीणा जगताप या तिघांना सामोरे जाण्याशिवाय माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता. अशा व्यक्ती मला माझ्या खऱ्या आयुष्यात भेटल्या असत्या तर त्यांच्याकडे मी दुर्लक्षच केले असते. पण या सगळ्या मानसिक त्रासाचा माझ्या आरोग्यावर परिणाम होत होता. केवळ तीन आठवड्यात माझे दहा किलो वजन कमी झाले. मी या घरात राहिले असते तर मीच जिंकले असते याची मला खात्री आहे. पण कधीकधी या सगळ्या गोष्टींपेक्षा आपल्या आरोग्याला अधिक महत्त्व द्यावे लागते. 

शिवानी घराच्या बाहेर येऊन आता काही दिवस झाले आहेत. तिच्या या निर्णयानंतर तिच्या फॅन्सचे काय म्हणणे आहे असे विचारले असता ती सांगते, मी घरातून बाहेर आल्यानंतर मी आधीचे किंवा आताचे एकही बिग बॉसचे भाग पाहिलेले नाहीत किंवा सोशल मीडियावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या देखील वाचलेल्या नाहीयेत. या सगळ्यामुळे मला अधिक त्रास होईल असे मला वाटते. पण मी या घरात संपूर्ण १०० दिवस राहिले नाही यासाठी माझ्या फॅन्सची आणि माझ्या जवळच्या व्यक्तींची माफी मागते. तसेच मला बिग बॉसच्या घरातून हकलले असे काहीजण पसरवत आहेत. त्यांना मी सांगू इच्छिते की, माझ्या हेल्थ इश्शूमुळे मी घराच्या बाहेर जाण्याची विनंती बिग बॉसकडे केली आणि ती त्यांनी मान्य केली. त्यामुळे अशाप्रकारच्या चुकीच्या गोष्टी पसरवू नका. 


Web Title: Bigg Boss Marathi 2 Exclusive: This is a reason why Shivani surve left Bigg boss house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.