ठळक मुद्देयेत्या विकेन्डच्या डावात शिवानी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात येईल असे सांगण्यात येत आहे.

'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोण स्पर्धक विजेता ठरणार याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहेत. या आठवड्यात लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर घरातून बाहेर पडल्या. त्या या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवतील असे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. पण त्यांची निराशा झाली असेच म्हणावे लागेल.

बिग बॉस मराठी २ च्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला प्रेक्षकांचा आवडता एक सदस्य पुन्हा घरात परतणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवानी सुर्वे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. शिवानी, अभिजित बिचुकले आणि पराग कान्हेरे या स्पर्धकांना काही कारणांसाठी बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्यात आले होते. परंतु येत्या विकेन्डच्या डावात शिवानी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात येईल असे सांगण्यात येत आहे.

शिवानी सुर्वेला देखील बिग बॉस मराठी 2 च्या घरात परतण्याची इच्छा असल्याचे तिने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. तिने या मुलाखतीत म्हटले होते की, माझी तब्येत बरी झाल्यानंतर मला बिग बॉसच्या घरात परतायला आवडेल. आता शिवानी या कार्यक्रमात कधी परतणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 

बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमामुळे शिवानीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग मिळालेले असून देखील तिने या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. यावर लोकमतशी बोलताना शिवानीने सांगितले होते की, माझे काही हेल्थ इश्शू असल्याने घराच्या बाहेर पडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मी घरात जाण्याच्याआधीच माझ्या हेल्थ प्रोब्लेमविषयी बिग बॉस मराठीच्या टीमला कल्पना दिली होती आणि ते देखील मी घरात असताना जमेल तितकी मला मदत करत होते. पण घरात घडलेल्या काही घटनांमुळे मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे माझी तब्येत अधिक बिघडत होती. 


Web Title: bigg boss marathi 2 contestant shivani surve will come back to home?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.