ठळक मुद्देयेतोय मी... आता सगळ्यांचा हिशोब होणार... तू तो आणि ती पण जाणार अशी पोस्ट परागने नुकतीच लिहिलेली असून या पोस्टमुळेच पराग पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोण स्पर्धक विजेता ठरणार याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहेत. बिग बॉस मराठीचा फिनाले जसजसा जवळ येत आहे, तसतसा घरातील प्रत्येक सदस्य जिंकण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करत आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरात नुकतीच प्रेक्षकांची लाडकी शिवानी सुर्वे परतली आहे. शिवानी या कार्यक्रमात एक स्पर्धक नव्हे तर पाहुणी म्हणून आली आहे. शिवानीसोबतच अभिजित बिचुकले आणि पराग कान्हेरे या स्पर्धकांना काही कारणांसाठी बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले होते. आता मात्र परागच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. पराग बिग बॉस मराठीच्या घरात परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. परागने फेसबुकला लिहिलेल्या एका पोस्टमुळेच ही चर्चा सध्या सुरू आहे. 

येतोय मी... आता सगळ्यांचा हिशोब होणार... तू तो आणि ती पण जाणार अशी पोस्ट परागने नुकतीच लिहिलेली असून या पोस्टमुळेच पराग पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पराग या घरात वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरात जाणार की तो शिवानीप्रमाणेच बिग बॉस मराठीच्या घरात काही दिवसांचा पाहुणा असणार हे आपल्याला काहीच दिवसांत कळेल. 

पराग सध्या सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टिव्ह आहे. शिवानीचा बिग बॉसच्या घरात पुन्हा प्रवेश झाल्यानंतरही त्याने एक पोस्ट लिहिली होती. त्याने या पोस्टमध्ये लिहिले होते की, धक्का तर खरंच बसलाय मला... आता असा वाटायला लागले की, मी पण बिग बॉसच्या घरात फक्त शिव्या देऊन भांडणं केली असती तर मला पण रि-एंट्री दिली असती. या निर्णयामुळे मी खूपच उदास झालो आहे. 

नेहा शितोळे हिच्यासोबत केलेल्या गैरवर्तनामुळे परागला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पराग खरंच घरात परततोय की या पोस्टद्वारे परागला काही तरी वेगळे सांगायचे हे लवकरच कळेल.


Web Title: Bigg Boss Marathi 2 contestant Parag Kanhere will comeback in bigg Boss house?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.