बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या यशानंतर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रेटी उपस्थित असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीस आला असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज या कार्यक्रमाचा भाग आहेत. जाणून घेऊया या कार्यक्रमातील स्पर्धकांविषयी...

शिवानी सुर्वे
शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. 

माधव देवचक्के
माधव देवचक्केने हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. सरस्वती या मालिकेत त्याने साकारलेल्या कान्हा या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. हमारी देवरानी, बीन बनुंगा घोडी चढुंगा या मालिकांमधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. 

सुरेखा पुणेकर
सुरेखा पुणेकर यांना लावणी समाज्ञी म्हटले जाते. त्यांनी लावणी या कलेला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. या रावजी.., पिकल्या पानाचा या त्यांच्या गाजलेल्या लावण्या आहेत.

वीणा जगताप 
राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेद्वारे वीणाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.

पराग कान्हेरे

पराग हे एक प्रसिद्ध शेफ आहेत.

 

अभिजीत केळकर
अभिजीत केळकरने तुझे माझे जमेना, मधु इथे आणि चंद्र तिथे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तर काकस्पर्श, बालगंधर्व या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

विद्याधर जोशी 
विद्याधर जोशी यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असून ते नुकतेच भाई-व्यक्ती की वल्ली या चित्रपटात झळकले होते. 

वैशाली माडे
वैशाली ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका असून तिची अनेक गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत.

किशोरी शहाणे
किशोरी अनेक वर्षांपासून मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम करत असून एकेकाळच्या आघाडीच्या मराठी अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जात असे. त्या नुकत्याच पी एम नरेंद्र मोदी या चित्रपटात झळकल्या होत्या. 

नेहा शितोळे
नेहा शितोळे फू बाई फू या मालिकेमुळे नावारूपाला आली. तिने पोस्टर गर्ल, पोपट यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सेक्रेड गेम्स या प्रसिद्ध वेबसिरीजमध्ये देखील आपल्याला तिला पाहायला मिळाले होते.

दिगंबर नाईक
दिगंबर नाईक यांनी अनेक प्रसिद्ध नाटकांमध्ये काम केले आहे. नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, शिनमा हे त्यांचे चित्रपट गाजले आहेत.

अभिजीत बिचुकले
अभिजीत बिचुकले हे राजकारणी असून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांना ओळखले जाते. 

 

रुपाली भोसले
रुपाली भोसलेने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सुमीत राघवनसोबत बडी दूर से आये है या मालिकेत देखील ती झळकली होती.

शीव ठाकरे

शीव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती.

मैथिली जावकर

मैथिली जावकरने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, होशियार यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील ती झळकली आहे. 


Web Title: bigg boss marathi 2 contestant list
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.