नुकत्याच दिलेल्या ‘शाळा सुटली पाटी फुटली’ या टास्कमुळे बिग बॉसच्या घरात आतापर्यंतचे सर्वाधिक नाट्य आणि मस्त वातावरण बघायला मिळालं. टास्क दिवसेंदिवस आणखी रोचक होत चालले असल्याने घरातल्या सदस्यांना दरदिवशी परस्परांबद्दल नवनवी माहिती मिळते आहे. ‘वूट’च्या अनसीन अनदेखाच्या सर्वांत ताज्या क्लिपमध्ये या घरातील सदस्य पुणे आणि तिथल्या राहणीमानाबद्दल बोलताना दिसले.

किशोरी शहाणे, वैशाली माडे, वीणा जगताप, अभिजित केळकर आणि शिव ठाकरे हे जेवणाच्या टेबलावर बसले होते, पुणे आणि पुणेकर या विषयावर त्यांच्या हसतखेळत गप्पा रंगल्या होत्या. वीणा म्हणत होती, ‘खायचं, बसायचं, गॉसिप करायचं बस्स हेच काम आहे आपल्याला आणि रागवायचं तर खास करून एक सेशन आहे आपल्याकडे तेही कशावरही चिडायचं!’ आणि ते शाळेच्या टास्कसंबंधी गमतीजमतींवर गप्पा मारत बसले होते. वैशाली त्यांच्यात आली, ‘टिपिकल मुंबईकरांसारखं झालं आहे आपलं, भूक लागली नाही तरीही चालेल पण १ वाजला की जेवायचं.’ तिला वीणाने सहमती दाखवत उत्तर दिलं, ‘पुणेकर पण असेच आहेत त्यांना झोप लागते म्हणजे लागतेच २ वाजता!’


किशोरी भर घालते, ‘मी तर पहिल्यांदा त्रस्त व्हायचे, १२ ते ४ बंद. इतका प्रॉब्लेम होतो ना की, दुकानं सगळी बंद पुण्यातली पण नंतर सवय झाली त्याची.’ आणि तिने एक प्रसंग सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, ‘९ वाजता दुकानं उघडतात पुण्यात आणि १२ वाजता बंद होतात. माझ्या ओळखीचे एक जण आहेत पुण्यात, त्यांनी तर सकाळी ७.३०ला वाढदिवसाचा केक कापला कारण त्यांना दुकानावर यायचं होतं आणि त्‍याच्‍या मुलांना शाळेत जायचं होतं.’ पुढे म्हणाली, ‘इतकं प्रॅक्टिकल आहे पुणेकरांचं लाईफस्‍टाईल!’


या आधी बिचकुले यानेही त्याच्या पुण्यातील चाहत्यांबद्दल सांगितले होते, तर किशोरीने पुण्यातील अनुभवांचे किस्से सांगितले. शिवाय, आपणही पुणेकरांची जीवनशैली आणि त्यांच्या सवयींबद्दल अनभिज्ञ नाही आहोत, पण बिग बॉसमधील सदस्य पुण्याच्या थोडं जास्तच प्रेमात आहेत असं वाटतं.

अधिक जाणून घेण्यासाठी ‘वूट’ अनसीन अनदेखा पहात रहा!

 


Web Title: Bigg Boss Marathi 2: contestant gossiping on Pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.