Bigg Boss Marathi 2 Competitor Heena Panchal Out Of the House, is this the real reason? | Bigg Boss Marathi 2 स्पर्धक हीना पांचाळ बाहेर, हे आहे त्यामागचे खरं कारण?
Bigg Boss Marathi 2 स्पर्धक हीना पांचाळ बाहेर, हे आहे त्यामागचे खरं कारण?

बिग बॉस मराठी सिझन 2 चा या आठवड्यातील WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकरांनी अभिजीत बिचुकलेची, शिव - वीणाची शाळा घेतली. अभिजीत बिचुकले नेहेमीच चर्चेत असतो मांजरेकर यांनी बिचुकलेला घरात इतर सदस्यांची लायकी का काढता असा जाब विचारला. तर घरातील सदस्यांनादेखील बिचुकलेची त्यांच्यासोबत राहण्याची लायकी आहे का ?' असा प्रश्न विचारला तेंव्हा त्यावर बहुतेक सदस्यांनी बिचुकलेची त्यांच्यासोबत राहण्याची लायकी नाही असं उत्तर दिले. वूट आरोपी कोण यामध्ये रोहिणीने  शिवला आरोपी ठरवले. त्यांनी बिग बॉसची आणि आरोहीची माफी मागायला सांगितली, तर शिवला वीणा सोबत नव्हे तर आरोहसोबत डान्स सादर करावा अशी शिक्षा दिली. या आठवड्यात हीना आणि शिव हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले होते आणि कमी मत पडल्यामुळे हीनाला  घराबाहेर जावे लागले. वीणा खूप भावूक झाली होती. 

घरामधून हीना बाहेर पडल्यावर अभिजीत बिचुकलेने गाणे सादर केले... हीनाला तिच्या आतापर्यंत घरातील प्रवासाची AV दाखविण्यात आली. सुप्रसिध्द राशीतज्ञ शरद उपाध्ये मंचावर आले आणि त्यांनी प्रत्येक सदस्यांना त्यांच्या राशीबद्दल सांगितले. त्यांनी प्रत्येक सदस्याची राशीनुसार त्यांचे भविष्य सांगितले.

महेश मांजरेकरांनी सदस्यांना सल्ला दिला की कधी कधी डेंजर झोनमध्ये येणं चांगल असत. प्रेक्षक काय विचार आहेत त्याचा अंदाज येतो. तर रागावर ताबा ठेवा असा देखील सल्ला दिला. घरातील किशोरी शहाणे सोडल्या तर सगळ्यांना रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले, त्यातल्या त्यात शिवानीने आता त्यावर नियंत्रण ठेवले आहे. घरामध्ये एक खेळ खेळण्यात आला ज्यामध्ये सदस्यांना गाणं ओळखून डान्स सादर करायचा होता. वीणा आणि बिचुकले यांनी तू ''चिझ बडी है मस्त'' या गाण्यावर तर किशोरी शहाणे आणि अभिजित बिचुकलेने ''साकी साकी रे'' या गाण्यावर डान्स केला. 


Web Title: Bigg Boss Marathi 2 Competitor Heena Panchal Out Of the House, is this the real reason?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.