बिग बॉस मराठी 2 : हा सदस्य बनला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 06:00 PM2019-07-02T18:00:00+5:302019-07-02T18:00:00+5:30

'बिग बॉस'च्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. या दोन्ही उमेदवारांसाठी स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते.

Bigg Boss Marathi 2: Captain of Bigg Boss Marathi's house became this member | बिग बॉस मराठी 2 : हा सदस्य बनला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन

बिग बॉस मराठी 2 : हा सदस्य बनला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन

googlenewsNext


'बिग बॉस मराठी'च्या दूसऱ्या पर्वात या आठवड्यात अभिनेता माधव देवचके घराचा कॅप्टन बनला आहे. बिग बॉसने दिलेल्या सहनशक्ती टास्कमध्ये आपल्या खिलाडुवृत्तीने तो जिंकला आणि कॅप्टन बनला. 

'बिग बॉस'च्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. या दोन्ही उमेदवारांसाठी स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते. ह्या कार्यात जास्त वेळ उभे राहून माधव जिंकला. आणि त्याला कॅप्टनपद मिळाले. 

माधव देवचकेच्या जवळच्या सूत्रांच्या अनुसार, "बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात झालेल्या तणावमय वातावरणानंतर आता घराला सर्वांचे समजून घेणारा आणि सर्वांशी जुळवून घेणारा कॅप्टन हवा होता. आणि माधवच्या कॅप्टन बनण्याने घरातले वातावरण शांत राहण्यास नक्कीच मदत होईल." 

ह्या आठवड्यातल्या 'विकेन्डच्या वार'ला महेश मांजरेकरांनीही माधवच्या शांत स्वभावाचीच स्तूती केली होती.

महेश मांजरेकर म्हणाले होते, "ही डोन्ट हॅव एनी बॅड ब्लड इन दि बॉडी. माधव खूप भोळा आहे . तो कोणालाच वाईट बोलत नाही. कोणालाच दुखवत नाही. हे खरं तर ह्या गेममध्ये करून चालत नाही."

हीना आणि शिवमध्ये बरेच वाद होत असतात. मग ते वीणा वरून असो वा टास्क दरम्यान असो... आज देखील हीना आणि शिवमध्ये वादाची ठिणगी उडणार आहे. ग्रुपमधील सदस्य एकत्र बसले असताना वैशाली, शिव आणि अभिजीत यांच्यामध्ये गप्पा सुरु होत्या आणि ते एकमेकांची मज्जा करत होते. हीना अभिजीतला हाताला लागल्यामुळे क्रेप बँडेज लावत होती.

तर वैशाली शिवला अभिजीत वरून म्हणाली, "नात्यांमध्ये तो गल्लत करत नाही" त्यावर अभिजीत देखील म्हणाला अगदीच खरं आहे. आणि शिवने यावरून अभिजीतला चिडवायला सुरुवात केली. पण कुठेतरी हीनला या गोष्टीचा राग आला आणि ती शिववर भडकली. हीनाने शिवला खडसावून सांगितले, पुन्हा असं बोलास तर मी खूप घाणेरड्या शब्दांत उत्तर देणार.'' यावर शिवदेखील तिला म्हणाला तुझ्याशी गंमत नाही केली का मी, माझ्याशी असं बोलायचं नाही." शिव इथेच थांबला नाही तो पुढे म्हणाला, तुला गोष्टी नाही कळत तर मला विचार." शिव असं काय म्हणाला ज्यावरून हीना त्याच्यावर इतकी चिडली ? आता हे भांडण किती विकोपाला जाणार, कोण नमतं घेणार हे कळेल आजच्या भागामध्ये. 

Web Title: Bigg Boss Marathi 2: Captain of Bigg Boss Marathi's house became this member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.