Bigg Boss Marathi 2 : वाचा अभिजीत बिचुकले कोणाला म्हणत आहे येडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 02:24 PM2019-08-09T14:24:35+5:302019-08-09T14:26:43+5:30

आज अभिजीत बिचुकले आणि हिना पांचाळमध्ये एक चर्चा रंगलेली पाहायला मिळणार आहे... आता ही चर्चा कोणाबद्दल? का रंगली आहे? कशावरून सुरू झाली? हे तुम्हाला आजच्या भागात कळेल.

Bigg Boss Marathi 2: Abhijeet bichukale called crazy to shivani surve | Bigg Boss Marathi 2 : वाचा अभिजीत बिचुकले कोणाला म्हणत आहे येडी?

Bigg Boss Marathi 2 : वाचा अभिजीत बिचुकले कोणाला म्हणत आहे येडी?

googlenewsNext
ठळक मुद्देआता ही येडी सरकिट, शिवानी... ती गोड बोलत बसली माझ्याशी... हो की नाही? म्हणजे हम मै कुछ है, नही तो उसको हँडल करना पॉसिबल नही है...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अभिजीत बिचुकले आणि हिना पांचाळमध्ये एक चर्चा रंगलेली पाहायला मिळणार आहे... आता ही चर्चा कोणाबद्दल? का रंगली आहे? कशावरून सुरू झाली? हे तुम्हाला बिग बॉस मराठी 2 च्या आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. 

बिग बॉस मराठी 2 मध्ये शिवानी सुर्वेबद्दल बिचुकले हिनाला काही गोष्टी सांगताना दिसणार आहे... अभिजीत बिचुकलेचे म्हणणे आहे की, “कोणीही इथे हसत नाहीये... खेळत नाहीये... माझ्याबरोबर जे होतं, ते मी बोलतो... आता ही येडी सरकिट, शिवानी... ती गोड बोलत बसली माझ्याशी... हो की नाही? म्हणजे हम मै कुछ है, नही तो उसको हँडल करना पॉसिबल नही है... हिनाने त्यावर त्याला सांगितले, मुश्कील बात है... बिचुकले पुढे म्हणाला, मुश्किल है इसके साथ बात करना... “जो कोणी करेल शिवानीशी गप्पा गोष्टी त्याचा मेंदू होईल भ्रष्ट”... तरी पण मी तिला हसवलं, तिच्या नादाला लागणे म्हणजे .....”

आता अभिजीत बिचुकले असं का बोलला? असे बोलण्यामागे कोणता हेतू होता? कशावरून ही चर्चा सुरू झाली? शिवानी आणि बिचुकलेचे कुठल्या विषयावरून वाद नाही, गैरसमज नाही तरी बिचुकलेला असे का वाटते? हे आज कळेलच... 

बिग बॉस मराठी सीझन २ मधून घराघरात पोहचलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. मात्र जेव्हा बिचुकले घरातून एक्झिट घेणार कळताच त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. आता गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पुन्हा एकदा बिचुकलेला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. 

एकमेव राजकीय नेता म्हणून अभिजीत बिचुकलेने ‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या आठवड्यात घरातील सर्व स्पर्धकांनी बिचुकलेला टार्गेट केले. पण  बिचकुले घरातील सगळ्यांना पुरून उरला. बिग बॉसच्या घरातील त्याचा वावर आणि त्याची भांडणे सगळेच चर्चेचा विषय ठरले. बिग बॉस शोमुळे बिचुकलेची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. त्याच्या अटकेनंतर गुगलवर अभिजीत बिचुकले नावाचा सर्च वाढला होता. सर्चच्या बाबतीत त्याने ‘बिग बॉस मराठी 2’चे होस्ट महेश मांजरेकर यांनाही मागे टाकले होते.

Web Title: Bigg Boss Marathi 2: Abhijeet bichukale called crazy to shivani surve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.