बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधून अभिनेत्री वीणा जगताप घराघरात पोहचली. वीणा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिचा मेकओव्हर पहायला मिळतो आहे. 

वीणा जगतापने इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने पीच रंगाचा गाऊन परिधान केला. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोवर खूप कमेंट्स व लाईक्स येत आहेत. 


या घरातून बाहेर पडल्यानंतरही तिची लोकप्रियता कायम राहिली. बिग बॉसच्या घरात तिचं शिव ठाकरेसोबत फुललेलं प्रेम घराबाहेर पडल्यानंतर टिकेल की नाही, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. मात्र अद्याप त्यांच्यातील प्रेम कायम आहे. ते बऱ्याचदा एकत्र दिसतात.

 
शिव व वीणा या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.


लग्नाविषयी विचारले असता तो सांगतो, आता बाहेर आल्यानंतर या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे. माझ्या आईचे या सगळ्यात मत काय आहे हे महत्त्वाचे आहे.


शिव व वीणाचे चाहते ते दोघं लग्नबेडीत अडकणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Bigg Boss' fame Veena Jagtap's new photoshoot, love her photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.