कंगना रनौतला पाठिंबा दिल्यामुळे अभिनेत्याला झाली मारहाण, मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 08:00 PM2020-12-28T20:00:00+5:302020-12-28T20:01:25+5:30

प्रीतमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर आता घडलेल्या घटनेची चौकशी स्थानिक प्रशासन करणार आहे. 

Bigg Boss 8 fame Pritam Singh alleges assault and vandalism by goons for supporting Kangana Ranaut | कंगना रनौतला पाठिंबा दिल्यामुळे अभिनेत्याला झाली मारहाण, मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

कंगना रनौतला पाठिंबा दिल्यामुळे अभिनेत्याला झाली मारहाण, मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

googlenewsNext
ठळक मुद्देप्रीतम सिंहने बिग बॉसच्या आठव्या सिझनमध्ये उपस्थिती लावली होती. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे की, एका राजकीय नेत्याने माझ्यासोबत आणि माझ्या कुटंबियांसोबत हाणामारी केली. तसेच माझ्या दुकानाची तोडफोड केली.

कंगना रणौतला पाठिंबा दिल्यामुळे बिग बॉसचा पूर्व स्पर्धक प्रीतम सिंहला मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. नागपूरमधील काही लोकांच्या गटाने त्याला मारहाण केले असून हे लोक एका राजकीय पक्षाचे असल्याचे म्हटले जात आहे. याबद्दल प्रीतमने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. प्रीतमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर आता घडलेल्या घटनेची चौकशी स्थानिक प्रशासन करणार आहे. 

प्रीतम सिंहने बिग बॉसच्या आठव्या सिझनमध्ये उपस्थिती लावली होती. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे की, एका राजकीय नेत्याने माझ्यासोबत आणि माझ्या कुटंबियांसोबत हाणामारी केली. तसेच माझ्या दुकानाची तोडफोड केली. 

प्रीतम सिंहचे म्हणणे आहे की, त्याने गेल्या काही दिवसांपासून कंगनाला काही मुद्द्यांवर समर्थन दर्शवले होते. प्रीतम सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याने या व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे.  प्रीतमने आणखी एक पोस्ट शेअर करत त्याला मारहाण केलेल्या व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. प्रीतमने या पोस्टसोबत लिहिले आहे की, या व्यक्तीने माझ्या दुकानात घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या कुटुंबियांसमोर शिवीगाळ करण्यात आली. माझ्या जीवाला धोका आहे. मी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून मी केवळ कंगनाचा समर्थक असल्याने माझ्यासोबत हा प्रकार घडला आहे.  

Web Title: Bigg Boss 8 fame Pritam Singh alleges assault and vandalism by goons for supporting Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.