‘Bigg Boss 15’मध्ये होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री! शमिता शेट्टीला मिळणार ‘आधार’ अन् करण कुंद्राला ‘जोर का झटका’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 01:03 PM2021-10-18T13:03:34+5:302021-10-18T13:04:25+5:30

Bigg Boss 15 : होय, बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे आणि वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी दोन नावांची जोरदार चर्चा आहे.

Bigg Boss 15 Will Raqesh Bapat and Anusha Dandekar join Salman Khan’s show as wildcard contestants? | ‘Bigg Boss 15’मध्ये होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री! शमिता शेट्टीला मिळणार ‘आधार’ अन् करण कुंद्राला ‘जोर का झटका’

‘Bigg Boss 15’मध्ये होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री! शमिता शेट्टीला मिळणार ‘आधार’ अन् करण कुंद्राला ‘जोर का झटका’

googlenewsNext
ठळक मुद्देसूत्रांचे मानाल तर, अनुषाला बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली गेली आहे.

 ‘बिग बॉस 15’  (Bigg Boss 15 ) हा शो सध्या धम्माल करतोय. दोनच आठवड्यात शो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. याआधीच्या सर्व सीझनपेक्षा यंदाचा सीझन स्पर्धकांमधील भांडणांपासून रोमान्सपर्यंत ओव्हर द टॉप पोहोचला आहे. केवळ स्पर्धक नाही तर मेकर्सही हा सीझन अधिकाधिक रोमांचक आणि मनोरंजक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आता काय तर बिग बॉसच्या घरात एंटरटेनमेंटचा धमाका होणार आहे. होय, रिपोर्टनुसार आता बिग बॉसच्या घरात दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री  (Bigg Boss Wild Card Entry) होणार आहेत. साहजिकच या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने घरातील अख्खी समीकरणे बदलताना दिसणार आहेत. वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी दोन नावांची जोरदार चर्चा आहे. होय, ही दोन नावं म्हणजे, राकेट बापट ((Raqesh Bapat))आणि अनुषा दांडेकर (Anusha Dandekar).

राकेश बापटअनुषा दांडेकर यांच घरातील दोन खास सदस्यांसोबतचं नातं तुम्हाला ठाऊक आहेच. सध्या राकेश बापट हा शमिता शेट्टीचा (Shamita Shetty) बॉयफ्रेन्ड म्हणून ओळखला जातोय. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शमिता व राकेश बापट यांचा रोमान्स तुम्ही पाहिला असेलच. ‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर पडल्यानंतरही शमिता व राकेश एकत्र दिसले. आता हाच राकेश बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार, अशी चर्चा आहे. राकेश घरात आलाच तर शमिताला मोठा आधार मिळेल, यात शंका नाही.

अनुषा दांडेकरबद्दल बोलायचं तर ती करण कुंद्राची (Karan Kundrra) एक्स-गर्लफ्रेन्ड आहे. दोघेही जवळजवळ 6 वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. काही महिन्यांपूर्वीच दोघांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर अनुषाने करणवर चीटिंगचा आरोप केला होता. सूत्रांचे मानाल तर, अनुषाला बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली गेली आहे. तिने ही ऑफर स्वीकारलीच आणि ती बिग बॉसच्या घरात गेलीच तर करण व अनुषाची केमिस्ट्री घरात कशी रंगते, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.

Read in English

Web Title: Bigg Boss 15 Will Raqesh Bapat and Anusha Dandekar join Salman Khan’s show as wildcard contestants?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.