Bigg Boss 15: राग इतका अनावर झाला की रश्मी देसाईनं देवोलिनाच्या थोबाडीत हाणली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 04:03 PM2022-01-20T16:03:22+5:302022-01-20T16:04:45+5:30

Bigg Boss 15:  ‘टिकट टू फिनाले’ टास्क जिंकण्यासाठी रश्मी व देवोलिना अशा काही भिडल्या की, दोघींनाही अनेक वर्षांच्या मैत्रीचा विसर पडला. वाद इतका विकोपाला गेला की, रश्मीने थेट देवोलिनाच्या थोबाडीत हाणली.

Bigg Boss 15 updates rashami desai slap devoleena bhattacharjee in bigg boss 15 | Bigg Boss 15: राग इतका अनावर झाला की रश्मी देसाईनं देवोलिनाच्या थोबाडीत हाणली!!

Bigg Boss 15: राग इतका अनावर झाला की रश्मी देसाईनं देवोलिनाच्या थोबाडीत हाणली!!

googlenewsNext

Bigg Boss 15:  ‘बिग बॉस’च्या घरात कधी काय होईल, याचा नेम नाही. आता ‘बिग बॉस’च्या 15 व्या सीझनचेच उदाहरण द्या. शो अंतिम टप्प्यात आहेत. पण बिग बॉसच्या घरातील भांडण थांबायचं नाव घेत नाहीये. होय, दोन जुन्या मैत्रिणींमधला वाद विकोपाला गेला आहे.  आम्ही बोलतोय ते देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) व रश्मी देसाई (Rashami Desai ) या दोघींबद्दल.

 ‘टिकट टू फिनाले’ टास्क जिंकण्यासाठी रश्मी व देवोलिना अशा काही भिडल्या की, दोघींनाही अनेक वर्षांच्या मैत्रीचा विसर पडला. वाद इतका विकोपाला गेला की, रश्मीने थेट देवोलिनाच्या थोबाडीत हाणली.

याचा प्रोमो सध्या व्हायरल होतोय. यात रश्मी व देवोलिना एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. बिग बॉसने घरातील स्पर्धकांना व्हीआयपी झोनमध्ये जाण्याची एक शेवटची संधी दिली. रश्मी व देवोलिनाला कुठल्याही स्थितीत ही संधी गमवायची नव्हती. अर्थात ‘टिकिट टू फिनाले’ देण्याचा पॉवर राखी सावंतकडे होता. दोघीही राखीची मनधरणी करताना दिसतात. पण राखीमुळेच दोघींमध्ये वादाची ठिणगी पडते. रश्मी व देवोलिना दोघीतही जोरदार राडा होतो आणि एका क्षणाला रश्मीचा राग इतका अनावर होतो की, ती देवोलिनाच्या कानशीलात लगावते.
आता या भांडणाचा शेवट कसा होतो? रश्मीला याची काय शिक्षा मिळते, ते येणा-या एपिसोडमध्ये दिसेलच.

याआधी टिकट टू फिनाले टास्कमध्ये देवोलिना अभिजीत बिचुकलेच्या हाताला चावा घेताना दिसली होती. बिचुकले देवोलीनाच्या हातात असलेला बॉल खेचण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे देवोलीना त्याला जोरात चावते. देवोलीनाने केलेल्या या कृतीमुळे अभिजीत प्रचंड संतापतो आणि तिला घरातून बाहेर काढा अशी मागणी करतो. इतकंच नाही तर तो थेट  जमिनीवर पडलेला दगड उचलतो आणि तिला मारायला धावतो. दरम्यान, या प्रकारानंतर घरातील सगळेच जण गोंधळून जातात. तर रश्मी दुसरीकडे बिचुकलेंना थांबवण्याचा प्रयत्न करते.  

Web Title: Bigg Boss 15 updates rashami desai slap devoleena bhattacharjee in bigg boss 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.