शवपेटी? तुम्हाला वेड लागलं का?  ‘Bigg Boss 15’चा प्रोमो पाहून भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 03:12 PM2021-11-24T15:12:04+5:302021-11-24T15:13:49+5:30

Bigg Boss 15 : काही नवं आणि रोमांचक करण्याचा मेकर्स प्रयत्न प्रेक्षकांना अजिबात रूचला नाही. मग काय, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

bigg boss 15 trolled on using coffin for eliminated contestant | शवपेटी? तुम्हाला वेड लागलं का?  ‘Bigg Boss 15’चा प्रोमो पाहून भडकले नेटकरी

शवपेटी? तुम्हाला वेड लागलं का?  ‘Bigg Boss 15’चा प्रोमो पाहून भडकले नेटकरी

googlenewsNext

बिग बॉस शो आणि वाद यांचं जुनं नातं आहे. बिग बॉसच्या घरात एक ना अनेक गोष्टी घडतात आणि बाहेरच्या जगात त्याचे पडसाद उमटतात. तूर्तास ‘बिग बॉस 15’नं (Bigg Boss 15) एक वाद ओढवून घेतलाये. होय, या शोचा एक प्रोमो रिलीज झाला आणि तो पाहून चाहते भडकले. आता असं काय झालं, तर एलिमिनेट कंटेस्टंटला घराबाहेर काढण्यासाठी चक्क शवपेटीचा वापर करण्यात आला. काही नवं आणि रोमांचक करण्याचा मेकर्स हा प्रयत्न प्रेक्षकांना मात्र अजिबात रूचला नाही. मग काय, सोशल मीडियावर  तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

 ‘बिग बॉस 15’च्या मेकर्सनी आगामी  एलिमिनेशन एपिसोडचा प्रोमो जारी केला. एलिमिनेट झालेल्या स्पर्धकाला शवपेटीद्वारे बिग बॉसच्या घराबाहेर काढल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसलं. हा व्हिडीओ पाहताच नेटक-यांचा संताप अनावर झाला.  काहींनी याला अतिशय बकवास आयडिया असल्याचं म्हटलं तर अनेकांनी बिग बॉसच्या क्रिएटीव्ह टीमची चक्क लाज काढली.

जिवंत असणा-या व्यक्तिला शवपेटीत टाकण्याची ही कल्पना बकवास आहे. तुम्हाला लाज वाटायला हवी, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. कृपा करून असं काहीही करू नका. कोरोना काळातील वाईट दिवस किमान लक्षात ठेवा, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. शवपेटी? तुम्हाला वेड लागलं का? असा संतप्त सवाल एका युजरने केला.

सिम्बा आऊट
बिग बॉसच्या घरातील सर्व अपडेट्स देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘द खबरी’नुसार,‘बिग बॉस 15’मधून सिम्बा नागपाल हा बाद झाला आहे. यानंतर लवकरच घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. देबोलिना भट्टाचार्जी, रश्मी देसाई आणि अभिजीत बिचुकले हे चॅलेंजर म्हणून घरात येणार आहे. वीकेंड का वार एपिसोडेमध्ये सलमानने आता शोमध्ये केवळ टॉप 5 सर्वात मजबूत स्पर्धकचं राहणार, बाकी बाहेर जाणार, अशी घोषणा केली होती. जय भानुशाली, राजीव अदातिया, सिम्बा नागाल, उमर रियाज, नेहा भसीन, विशाल कोटियन बॉटम6 मध्ये होते. यापैकी सिम्बा हा बाहेर पडल्याचं कळतंय.

Web Title: bigg boss 15 trolled on using coffin for eliminated contestant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.