Bigg Boss 15: यंदाच्या सीझनसाठी सलमान खान घेतोय इतके मानधन? आकडा वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 08:20 PM2021-12-07T20:20:42+5:302021-12-07T20:21:59+5:30

सलमान खान बिग बॉसच्या चौथ्या सीझनपासून या शोचे सर्व सीझन होस्ट करत आहे.

Bigg Boss 15: Is Salman Khan taking so much fees for this season? Shock to read | Bigg Boss 15: यंदाच्या सीझनसाठी सलमान खान घेतोय इतके मानधन? आकडा वाचून बसेल धक्का

Bigg Boss 15: यंदाच्या सीझनसाठी सलमान खान घेतोय इतके मानधन? आकडा वाचून बसेल धक्का

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसचा पंधरावा सीझन सातत्याने चर्चेत येतो आहे. या शोचा होस्ट बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करत आहे. यासाठी त्याला मिळणाऱ्या मानधनाचा आकडा वाचून प्रेक्षक अवाक् झाले आहेत. बिग बॉस १५ साठी सलमान खान मानधनाच्या स्वरूपात जवळपास ३५० कोटी रूपये घेत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

बिग बॉस शोचे होस्ट करण्यासाठी सलमान खानला मिळणाऱ्या मानधनाबद्दल निर्मात्यांनी आणि त्याने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. सलमान खानने बिग बॉस १५च्या १४ एपिसोडसाठी १००-२०० कोटी नाही तर संपूर्ण ३५० कोटी रूपये घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सलमान खानचे बिग बॉससोबत आहे खास कनेक्शन

सलमान खान बिग बॉसच्या चौथ्या सीझनपासून या शोचे सर्व सीझन होस्ट करत आहे. म्हणूनच शोसोबत त्याचे कनेक्शन खूप खास आहे. शोमध्ये घरातील सदस्यांसोबत मस्ती करणे, त्यांच्या कामगिरीची प्रशंसा करणे या सर्व गोष्टी सलमान खान उत्तम प्रकारे हाताळतो. सलमानच्या मानधनाचा आकडा ऐकून प्रेक्षक हैराण झाले आहेत. लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, सलमान एवढी फी घेत असताना शोचे बजेट काय असेल? सध्या सलमानच्या फीची चर्चा तुफान व्हायरल होत आहे. 

Web Title: Bigg Boss 15: Is Salman Khan taking so much fees for this season? Shock to read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.