Bigg Boss 15: राखी सावंतचा नवरा भडकला, करण कुंद्राशी भिडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 11:32 AM2021-11-29T11:32:51+5:302021-11-29T11:33:26+5:30

Bigg Boss 15: होय, घरात येऊन एक दिवस होत नाही तोच राखी सावंत व रितेशने करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश या दोघांशी पंगा घेतला.

Bigg Boss 15: Rakhi Sawant’s husband Ritesh threats Karan Kundrra, watch viral video | Bigg Boss 15: राखी सावंतचा नवरा भडकला, करण कुंद्राशी भिडला

Bigg Boss 15: राखी सावंतचा नवरा भडकला, करण कुंद्राशी भिडला

Next

बिग बॉस 15’मध्ये  (Bigg Boss 15) राखी सावंतची (Rakhi Sawant) एन्ट्री झालीये. सोबत तिचा पती रितेश (Ritesh) हाही आहे. साहजिकच बिग बॉसच्या घरात नव्या वादांना सुरुवात झाली आहे. होय, घरात येऊन एक दिवस होत नाही तोच राखी सावंत व रितेशने करण कुंद्रा (Karan Kundrra) व तेजस्वी प्रकाश या दोघांशी पंगा घेतला. करण व तेजस्वीचं बिग बॉसच्या घरात फुललेलं नातं फेक असल्याचं राखी व रितेशला वाटतंय. साहजिकच करण व तेजस्वी यामुळे अपसेट आहेत. आता कुठेतरी हा राग निघणारच. झालं तसंच. रितेश व करण कुंद्रा यांच्यात यांच्यात जोरदार राडा झाला. याचा प्रोमो सध्या व्हायरल होतोय.
काल वीकेंड का वार एपिसोडमध्ये नेहा धूपिया बिग बॉसच्या घरात आली. घरात येताच तिने एक एका स्पर्धकामधील त्रूटींवर बोट ठेवणं सुरू केलं. घरातील सदस्यांनाही एकमेकांच्या त्रुटी सांगण्याचा टास्क देण्यात आला. याचवरून रितेश व करण कुंदा यांच्यात वाजलं.

रितेशमध्ये काय त्रुटी आहेत, असं करण कुंदाला विचारल्यावर करण ‘कायर’ लिहिलेलं पोस्टर उचलतो. रितेशला  ‘कायर’ म्हणण्यामागचं कारणही तो सांगतो. स्टॉकच्या व्हॅल्यू बीवी के ऊपर रखने वाला आदमी मेरे हिसाब से कायर आहे, असं तो म्हणतो आणि त्याचं ते वाक्य ऐकून राखीचा पती रितेश भडकतो. हा माझा खासगी मुद्दा आहे, असं रागारागात तो म्हणतो. पण करण कुंद्रा त्याला आणखी डिवचत त्याला ‘ लग्न करून पळून जाणारा माणूस’ म्हणतो. यामुळे रितेशचा पारा चढतो आणि करणच्या अंगावर धावून जातो. अन्य स्पर्धक दोघांना आवरण्याचा प्रयत्न करतात.
 

Read in English

Web Title: Bigg Boss 15: Rakhi Sawant’s husband Ritesh threats Karan Kundrra, watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app