Bigg Boss 15 : बिचुकले आला रे...! सुरू झाली अभिजीत बिचुकले व राखी सावंतची धम्माल कॉमेडी, प्रोमो पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 05:41 PM2021-11-30T17:41:57+5:302021-11-30T17:43:56+5:30

Bigg Boss 15 : सध्या राखी सावंत (Rakhi Sawant) व अभिजीत बिचुकलेचा (Abhijit Bichukale) एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

bigg boss 15 new promo update rakhi sawant and abhijit bichukale comedy | Bigg Boss 15 : बिचुकले आला रे...! सुरू झाली अभिजीत बिचुकले व राखी सावंतची धम्माल कॉमेडी, प्रोमो पाहाच

Bigg Boss 15 : बिचुकले आला रे...! सुरू झाली अभिजीत बिचुकले व राखी सावंतची धम्माल कॉमेडी, प्रोमो पाहाच

googlenewsNext

बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आधीच दाखल झालीये आणि आता अभिजीत बिचुकलेची (Abhijit Bichukale) धमाकेदार एन्ट्री झालीये. आता राखी व बिचुकले एकत्र म्हटल्यावर धम्माल तर होणारच. सध्या राखी व बिचुकलेचा एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
तर प्रोमो व्हिडीओमध्ये राखी सावंतअभिजीत बिचुकलेलाबिग बॉसचं घर दाखवतेय. बिचुकले बिग बॉसच्या घरातील बाथरूम बघतो आणि मी फक्त 24 तासांत एकदा जातो, असं म्हणतो. यावर का? तुम्हाला टॉयलेट जाणं बोरिंग वाटतं का? यावर बिचुकले ‘हो’ म्हणतो आणि खाना ही नहीं भाई, असं म्हणतो. यावर राखी डोक्यावर हात मारून घेत ‘टॉयलेट जाना बोरिंग लगता है इसलिए ये खाना ही नहीं खाएगा,’ असं म्हणते.

घरात येताच उमर रियाजची वाजलं
अभिजीत बिचुकले म्हटल्यावर राडा होणारच. झालंही तसंच. बिचुकलेनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आणि एन्ट्री घेतल्या घेतल्या त्याचं उमर रियाजसोबत वाजलं. ‘मैं औकात पे आता हूं ना तो किसी के बाप से नहीं डरता,’ असं बिचुकले म्हणतो. यानंतर तो बेड निवडतो आणि नेमका उमर रियाजचा बेड त्याला आवडतो. पण उमर त्याचा बेड बिचुकलेला देण्यास नकार देतो आणि मग इथेच राडा सुरू होतो.

अभिजीत बिचुकले हा ‘बिग बॉस मराठी’मध्ये दिसला होता. ‘बिग बॉस मराठी’मध्ये त्यानं अक्षरश: घर डोक्यावर घेतलं होतं. आता हाच बिचुकले बिग बॉस 15 मध्ये आला म्हटल्यावर तो काय करतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.  ‘बिग बॉस 15’मध्ये एन्ट्री घेण्याआधीच बिचुकलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती  होती. त्यामुळे त्याची एन्ट्री काहीशी लांबली होती. 

Web Title: bigg boss 15 new promo update rakhi sawant and abhijit bichukale comedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.