‘बिग बॉस 15’ फेम ईशान व मायशाचा रोमॅन्टिक व्हिडीओ लीक; ट्रोलर्स म्हणाले, सुधारणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 11:17 AM2021-11-30T11:17:05+5:302021-11-30T11:21:02+5:30

Miesha Iyer and Ieshaan Sehgaal Video Leaked From Hotel Corridor: हॉटेलच्या कॉरिडोरमध्ये सुरू झाला रोमान्स, पाहा व्हिडीओ

bigg boss 15 fame Miesha Iyer and Ieshaan Sehgaal Video Leaked From Hotel Corridor | ‘बिग बॉस 15’ फेम ईशान व मायशाचा रोमॅन्टिक व्हिडीओ लीक; ट्रोलर्स म्हणाले, सुधारणार नाही...

‘बिग बॉस 15’ फेम ईशान व मायशाचा रोमॅन्टिक व्हिडीओ लीक; ट्रोलर्स म्हणाले, सुधारणार नाही...

googlenewsNext

बिग बॉस 15’च्या ( Bigg Boss 15) घरात आपल्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीमुळे चर्चेत आलेले ईशान सहगल (Ieshaan Sehgaal) व मायशा अय्यर ( Miesha Iyer) शोमधून कधीच बाहेर पडलेत. पण घराबाहेरही त्यांच्या रोमान्सची चर्चा होतेय. होय, सध्या या दोघांचा  एक रोमॅन्टिक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ईशान व मायशा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.
हा व्हिडीओ एका हॉटेलच्या कॉरिडोरमधील आहेत. यात मायशा रेड कलरच्या हॉट वनपीसमध्ये दिसतेय तर ईशान ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये आहे. वाइन, डाइन अँड अ मॅन फाइन, या कॅप्शनसह मायशाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

ईशान व मायशाच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला आहे. पण अनेकांनी हा व्हिडीओ पाहून कपलला ट्रोल केलं आहे. तुम दोनो तो कभी नहीं सुधरोगे, अरे यार कितना फेक है दोनो, अशा प्रतिक्रिया अनेक नेटक-यांनी दिल्या आहेत.
ईशान व मायशाने ‘बिग बॉस 15’मध्ये स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली होती आणि शो सुरू होऊन आठवडा होत नाही तोच या दोघांमध्ये यांच्यात प्रेम फुललं होतं. पहिल्याच आठवड्यात ईशान व मायशा प्रेमात पडलेले पाहून शोचा होस्ट सलमान खानही अवाक् झाला होता.  ईशान सहगल  व मायशा अय्यर  दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की, आपण नॅशनल टीव्हीवर आहोत, याचाही त्यांना विसर पडला होता. अगदी नॅशनल टीव्हीवर एकच ब्लँकेट शेअर करण्यापासून किस करेपर्यंतच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या होत्या. सलमानने वेळोवेळी दोघांनाही समज दिली होती. शोमध्ये फक्त रोमान्स चालणार नाही. खेळ दाखवा, अशा स्पष्ट शब्दांत सलमानने ईशान व मायशाला समजावलं होतं. पण दोघांवरही याचा काही परिणाम झाला नाही. अखेर दोघंही बिग बॉसमधून बाद झालेत.

Web Title: bigg boss 15 fame Miesha Iyer and Ieshaan Sehgaal Video Leaked From Hotel Corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.