Bigg Boss 15 Breaking: 'बिग बॉस'च्या घरात राखी सावंत पती रितेशसह एन्ट्री घेणार, काय म्हणाली वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 08:59 PM2021-11-24T20:59:32+5:302021-11-24T21:00:00+5:30

Bigg Boss 15 Breaking: बिग बॉसच्या घरात राखी सावंत (Rakhi Sawant) चौथ्यांदा एन्ट्री करण्यास पूर्णपणे सज्ज झाली आहे. लक्षवेधी बाब अशी की राखी सावंत यावेळी बिग बॉसच्या घरात एकटी दाखल होत नाहीय.

Bigg boss 15 breaking rakhi sawant to enter in bb house with her husband promise double entertainment to audience | Bigg Boss 15 Breaking: 'बिग बॉस'च्या घरात राखी सावंत पती रितेशसह एन्ट्री घेणार, काय म्हणाली वाचा...

Bigg Boss 15 Breaking: 'बिग बॉस'च्या घरात राखी सावंत पती रितेशसह एन्ट्री घेणार, काय म्हणाली वाचा...

googlenewsNext

Bigg Boss 15 Breaking: बिग बॉसच्या घरात राखी सावंत (Rakhi Sawant) चौथ्यांदा एन्ट्री करण्यास पूर्णपणे सज्ज झाली आहे. लक्षवेधी बाब अशी की राखी सावंत यावेळी बिग बॉसच्या घरात एकटी दाखल होत नाहीय. तर ती तिचा कथित पती रितेशसोबत बिग बॉसच्या घरात दाखल होणार असल्याची माहिती तिनं स्वत: एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. त्यामुळे आता राखी सावंतचा पती नेमका कोण आहे आणि तो कसा दिसतो हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना आहे. 

राखी सावंतनं तिचं लग्न झालं असून पतीचं नाव रितेश असल्याचं सांगितलं होतं. पण आजवर तिनं आपल्या पतीला कधीच कॅमेरासमोर आणलेलं नाही. राखी सावंतनं रितेशचं खूप कौतुक करत तो अभिनेता रणवीर सिंग आणि हृतिक रोशनपेक्षाही अधिक हॅण्डसम दिसतो, असं म्हटलं आहे. 

राखी सावंतनं दिलेल्या माहितीनं आता 'बिग बॉस'च्या या पर्वालाही नवा तडका मिळणार आहे. पती रितेशसोबत बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार असले तरी माझं पहिलं प्रेम बिग बॉसच आहे असंही ती म्हणाली. बिग बॉसनं मला एक वेगळी ओळख दिली. आज मी जे काही आहे त्यात बिग बॉस शोचं मोठं योगदान आहे, असंही राखी म्हणाली. 

'बिग बॉस'चे सर्व स्पर्धक राखीचे मित्र
बिग बॉस-१५ मध्ये सहभागी असलेले सर्वच सदस्य राखी सावंत हिला आधीपासूनच ओळखतात. घरातील सर्व सदस्यांसोबत माझी चांगली मैत्री आहे, असंही राखी म्हणाली आहे. सर्व माझे मित्र आहेत पण प्रत्येकाला जरा जागं करण्याची गरज आहे आणि वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन मी तेच काम करणार आहे, असं राखी सावंत म्हणाली. 

राखी सावंत सोबतच शोमध्ये रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्य देखील बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहेत. दोघीही राखीच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी देखील घरात दाखल होणार आहेत याचा आनंद असल्याचं राखी सांगते. 

राखी सावंत क्वारंटाईन
राखी सावंत सध्या क्वारंटाईन आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश घेण्याआधी राखी सावंत हिला नियमानुसार क्वारंटाईन व्हावं लागलं आहे. बिग बॉसच्या यंदाच्या सीझनबाबत बोलायचं झालं तर यावेळीच्या सीझनला चांगली ओपनिंग मिळाली होती. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये शोचा टीआरपी घटला आहे. बिग बॉसचा टीआरपी पुन्हा वर आणण्यासाठी निर्मात्यांकडून वेगवेगळे फंडे आजमावले जात आहेत. 

Web Title: Bigg boss 15 breaking rakhi sawant to enter in bb house with her husband promise double entertainment to audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.