टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकची ''आज मै उपर आसमाँ निचे'' अशीच अवस्था झाली असणार बिग बॉ १४ची विजेती बनल्यानंतर तिने सा-यांचे आभार मानले.  ट्रॉफी आणि 36 लाख रुपये तिने जिंकले आहेत. 'बिग बॉस 14' ची विजेती झाल्यानंतर रुबीना दिलकने आता पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. पुन्हा एकदा ती लग्नबंधनात अडकणार आहे.

रुबीना दिलैक पती अभिनव शुक्लाबरोबर पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची ईच्छा असल्याचे सांगितले, अभिनवनेही रुबीनासाठी पुन्हा एकदा लग्न करण्याला होकारही दिला आहे. सध्या हे कपल डेस्टिनेश वेडिंग करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे लग्नासाठी खास लोकेशनच्या शोधात कपल असल्याचे चर्चा आहेत.

बिग बॉस १४ मध्ये रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला ही जोडी सर्वात हिट ठरली.याविषयी रुबीना म्हणाली, 'बिग बॉसच्या घरात अभिनवच्या पाठिंब्यामुळेच मी स्ट्राँग बनले आणि प्रत्येक गोष्टीचा सामना केला. जेव्हा 'बिग बॉस १४'ची विजेती बनल्याचे घोषित केले गेले तेव्हा अभिनवने मला मिठी मारली, किस केले आणि माझे अभिनंदन केले.

तो माझ्याबरोबर होता हे माझ्यासाठी खूप होतं. बिग बॉस १४ मध्ये एंट्री केल्यानंतर  ख-या अर्थाने एकमेकांना  ओळखायला लागलो.जर हा शो नसता तर आम्ही वेगळे झालो असतो. पती पत्नीचे नाते कसे असावे हे या घरात समजले आणि त्यामुळे पुन्हा एकदा गमावलेले नाते मी कमावू शकले आणि आता पुन्हा एकदा आम्ही दोघे नव्याने आमच्या आयुष्याला सुरुवात करणार आहोत.

“एक वेळ अशी आली होती, जेव्हा मला अभिनवपासून घटस्फोट हवा होता. त्यामुळे आम्हाला नोव्हेंबरपर्यंत विचार करण्याचा कालावधी देण्यात आला होता. याचदरम्यान आम्हाला बिग बॉस 14 ची ऑफर आली. या शोच्या निमित्ताने आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल यासाठीच आम्ही या शोची ऑफर स्वीकारली”, असे रुबिनाने सांगितले. विशेष म्हणजे रुबिनाला रडताना पाहून अभिनवचे डोळेदेखील पाणावले.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 14: Rubina Dilaik confirms that a destination wedding is on her mind; says, 'There will be a second wedding for sure'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.