Bigg Boss : स्वीमिंग पूल शेजारी धाडकन पडला राहुल महाजन, टॉवेलही सुटला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 12:21 PM2020-12-19T12:21:31+5:302020-12-19T12:22:31+5:30

फॅन्सही आता बिग बॉस शो बघायला लागले आहेत. अशात राखी सावंत आणि राहुल महाजनचे बिग बॉसच्या घरातील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Bigg Boss 14 : Rahul Mahajan fall pool side towel drop video viral | Bigg Boss : स्वीमिंग पूल शेजारी धाडकन पडला राहुल महाजन, टॉवेलही सुटला आणि....

Bigg Boss : स्वीमिंग पूल शेजारी धाडकन पडला राहुल महाजन, टॉवेलही सुटला आणि....

googlenewsNext

बिग बॉस १४ मध्ये जुने स्पर्धक आल्याने आता नवा धिंगाणा आणि हंगामा बघायला मिळत आहे. यावर्षी डाउन झालेला शो जुन्या स्पर्धकांमुळे जरा इंटरेस्टींग झाला आहे. फॅन्सही आता हा शो बघायला लागले आहेत. अशात राखी सावंत आणि राहुल महाजनचे बिग बॉसच्या घरातील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

अली निक्की, रूबीना स्वीमिंग पूलमध्ये आराम करत होते. अशात राहुल येतो. सर्वातआधी तो त्याचा माइक काढून ठेवतो. अशात पुन्हा माइक घेऊन घराच्या जात जातो आणि काही वेळाने हातात मॅट घेऊन येतो. यादरम्यान, पूलच्या आतून अली गोनी त्याला बोलवतो. पण तिथे असलेल्या चेअरमुळे राहुल महाजन खाली पडतो आणि त्याचा टॉवेलही सुटतो.

जसा राहुल महाजन खाली पडतो त्याचा टॉवेल सुटतो.  अशात पूलमध्ये असलेल्या रूबीना आणि निक्की हसू लागतात. अली गोनी त्याची विचारपूस करतो. राहुल महाजन जसा खाली पडतो त्याला उचलण्यासाठी मनु पंजाबी धावत येतो. त्यानंतर काही वेळाने राहुल टॉवेल काढून मॅटवर बसतो.

राखी सावंतही पडली

दुसरीकडे बिग बॉसच्या घरात राखी सावंतही डान्स करता करता अचानक खाली पडते. झालं असं की, रूबीनाला राखी सावंत चहा मागते. दरम्यान लीविंग एरियात राखी डान्स करू लागते. राखी म्हणते की, मला काढा हवाय. यादरम्यान रूबीना तिला रोला रप्पा म्हणणं शिकवते. यावर डान्स करताना राखी अचानक खाली पडते.  
 

Web Title: Bigg Boss 14 : Rahul Mahajan fall pool side towel drop video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.