'बिग बॉस 14'ची लगबग झाली सुरू, 'अंगूरी भाभी' दिसणार बिग बॉसच्या घरात? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 11:39 AM2020-06-08T11:39:47+5:302020-06-08T11:40:35+5:30

बिग बॉसच्या 14व्या सीझनसाठी 'भाभीजी घर पर है'मधील अंगूरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रेला अप्रोच करण्यात आले आहे. 

'Bigg Boss 14' process is started, 'Anguri Bhabhi' Aka Shubhangi Atre will be seen in Bigg Boss's house? | 'बिग बॉस 14'ची लगबग झाली सुरू, 'अंगूरी भाभी' दिसणार बिग बॉसच्या घरात? 

'बिग बॉस 14'ची लगबग झाली सुरू, 'अंगूरी भाभी' दिसणार बिग बॉसच्या घरात? 

googlenewsNext

बिग बॉस सीझन 14ची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. त्यात आता बिग बॉसच्या तयारीला सुरूवात झाल्याचे समजते आहे. नुकतेच या शोसाठी भाभीजी घर पर हैमधील अंगूरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रेला अप्रोच करण्यात आल्याचे समोर आले होते. मात्र आता याबाबत तिचे मत समोर आले आहे. तिने सांगितले की, ती बिग बॉस 14मध्ये सहभागी होणार नाही. 

आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, शुभांगी अत्रेला बिग बॉसच्या चौदाव्या सीझनसाठी विचारण्यात आले होते. याबाबत तिने सांगितले की, हो हे खरं आहे की मला बिग बॉस 14साठी कॉल आला होता. पण आता मी भाभीजी घर पर है या मालिकेत काम करते आहे आणि माझे सर्वात पहिलं प्राधान्य मालिका आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाण्याचा प्रश्नच येत नाही.

पुढे ती म्हणाली की, बिग बॉससारखा शो माझ्यासाठी नाही कारण जो कंटेट लोकांना आवडतो तो मी देऊ शकणार नाही. भांडण वगैरे मला जमत नाही पण पुढचं मला माहित नाही. कदाचित भविष्यात माझं मत बदलेल आणि मी बिग बॉसचा हिस्सा बनेन.


शुभांगीने हेदेखील सांगितले की, मला टीव्हीवर दिसण्याआधी मुलीचा विचार करावा लागतो. आई असल्याच्या नात्याने मला माझ्या मुलीची देखील काळजी घ्यावी लागते. मला विचार करावा लागतो की ती मला टीव्हीवर कसे पाहते आणि त्यात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते ते माझ्या मुलीने पाहू नये असे मला वाटते. बिग बॉस माझा फेव्हरिट शो आहे.

शुभांगीने भाभीजी घर पर हैच्या शूटिंगबद्दल सांगितले. ती म्हणाली की, या महिन्यात भाभीजी घर पर हैच्या शूटिंगला सुरूवात होईल. 

बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये जुनी अंगुरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे सहभागी झाली होती आणि ती या सीझनची विजेती होती. या सीझनची खूप चर्चादेखील झाली होती. 

Web Title: 'Bigg Boss 14' process is started, 'Anguri Bhabhi' Aka Shubhangi Atre will be seen in Bigg Boss's house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.