Bigg Boss 14: फक्त तीन महिने होते पवित्रा पुनिया आणि पारस छाबडा रिलेशनशीपमध्ये , या कारणामुळे झाले होते ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:40 PM2020-12-18T14:40:58+5:302020-12-18T14:58:17+5:30

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून पवित्रा तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे.

Bigg boss 14 pavitra punia open up about her relationship with paras chhabra reveals why they did breakup | Bigg Boss 14: फक्त तीन महिने होते पवित्रा पुनिया आणि पारस छाबडा रिलेशनशीपमध्ये , या कारणामुळे झाले होते ब्रेकअप

Bigg Boss 14: फक्त तीन महिने होते पवित्रा पुनिया आणि पारस छाबडा रिलेशनशीपमध्ये , या कारणामुळे झाले होते ब्रेकअप

googlenewsNext

टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया 'बिग बॉस 14'मधून बाहेर आली आहे. पण बाहेर आल्यानंतरही ती सतत चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून पवित्रा तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. 'बिग बॉस 13' फेम पारस छाबडासोबत असलेल्या रिशेनशीपसाून ते तिच्या लग्नापर्यंत अनेक गोष्टींमुळे ती चर्चेत आहे. पवित्रा पुनियाने पारस छाबरासोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन मौनंं सोडलंय.

आरजे सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत पवित्रा म्हणाले की, 'तिचे आणि पारसचे फक्त तीन महिने रिलेशनशीप  होते'. अभिनेत्रीने सांगितले की, पारस हा अगदी टिपिकल दिल्लीचा मुलगा आहे आणि त्याच्या अटीट्यूड मला सांभाळता आला नाही. अभिनेत्री म्हणते,"कोणी माझ्यावर थोडे प्रेम कमी केलं तरी चालेल मात्र नात्याचा किंवा  माझा कुणी आदर करणार नाही, हे मला चालणार नाही." माझे वैयक्तिक आयुष्य कोणी सार्वजनिक करणे हे माझे व्यक्तिमत्त्व नाही, परंतु लोकप्रियता मिळविण्यासाठी आणि बातम्यांमध्ये राहण्यासाठी कोणी असे केले तर ते करतच रहा. ' जेव्हा पवित्र बिग बॉसमध्ये होती तेव्हा पारसने तिच्याबद्दल बरेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. 

काही दिवसांपूर्वी पवित्राचा पती सुमित माहेश्वरी यांनी तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला होता.एका मुलाखती दरम्यान सुमित माहेश्वरीने असा दावा केला की, त्याचा आणि पवित्र पुनियाचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. पण लग्नानंतर पवित्राने त्याचा ४ वेळा विश्वासघात केला आहे.

Web Title: Bigg boss 14 pavitra punia open up about her relationship with paras chhabra reveals why they did breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.