बिग बॉस १४ शो अनेकांना ओळख मिळवून देतो. मात्र ड्रामा क्वीनमुळे बिग बॉस या शोला एक वेगळी ओळख मिळाली असे खुद्द शोच्या निर्मात्यांनी सांगत राखी सावंतचे कौतुक केले. एंटरटेंमेंटच्या फुल ऑन पॅकेज असलेली राखी सावंतने एकटीने हा संपूर्ण शो प्रचंड गाजवला. चॅलेंजर म्हणून एंट्री केलेल्या राखीने घरात तिच्या खाजगी आयुष्यापासून ते करिअरपर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला.

 

मात्र जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा मात्र अख्या जगाला हसवणारी राखी मात्र भावूक झाली. शोमध्ये एंट्री केल्यापासून ते शेटवच्या क्षणापर्यंत राखी मनोरंजन करत राहिली. त्यामुळे बिग बॉसनेही राखीला एक खास सरप्राईज दिले. लग्नानंतर राखी सावंत पती रितेश कधीच समोर आला नाही. 


आजपर्यंत कोणीच राखी सावंतच्या पतीला बघितले नाही. त्यामुळे सतत शोमध्ये विवाहीत असल्याचे सांगत राहिली पण कोणीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही. राखीने पतीविषयी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्या सगळ्या गोष्टींवरुन तिच्या पतीचा शोध घेण्यात आला आणि फिनालेमध्ये पहिल्यांदाच राखी सावंत पती रितेश समोर आला.

राखी सावंतला भेटण्यासाठी पती रितेशची घरात एंट्री होताच सा-यांनाच आश्चर्याचा धक्क बसला कारण घरात एंट्री केलेला राखी सावंतचा रितेश नाही तर जेनिलिया पती रितेश देशमुख निघाला. रितेश देशमुखने घरात एंट्री करताच सा-यांनाच फुल ऑन एंटरटेन केले. राखीने देखील रितेश देशमुखसह मजा मस्ती करत धमाल उडवून दिली होती. सध्या हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राखी सावंत समोर झालेली रितेशची अवस्थाही पाहण्यासारखीच होती. 

त्याने मला धमकी दिली म्हणून मी लग्न केले...! राखी सावंत शॉकिंग खुलासा

‘काही लोक अर्जंट शॉपिंगला निघतात, काही अर्जंट ब्रेकअप करतात. तसेच मी अर्जंट लग्न केले. भारतातील एका मोठ्या व्यक्तिने मला धमकी दिली होती. मी लग्न केले नाही तर तो मला उचलून नेईल, अशी धमकी त्याने मला दिली होती. मी याबद्दल पोलिसात तक्रार केली नाही. मी धमकी देणाºया त्या व्यक्तिचे नाव सांगितले तर तो आत्ताच मला शो बाहेर काढेन. त्या व्यक्तिच्या धमकीमुळेच मी लग्न केले. यात माझा पती रितेशचा काहीही गुन्हा नाही. माझ्याशी लग्न कर, असे मी त्याला म्हणाले. लग्नाआधी ना त्याने मला पाहिले होते, ना मी त्याला. मी फक्त त्याचे बँक बॅलेन्स पाहिले.’

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 14 Grand Finale: Rakhi Sawant Husband Riteish Finally Come to Meet Her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.