Bigg Boss 14: पहिल्या आठवड्यात घरातून बेघर होणार हा कंटेस्टंट, सीनिअर्सनी घेतला मोठा निर्णय

By तेजल गावडे | Published: October 12, 2020 08:18 PM2020-10-12T20:18:13+5:302020-10-12T20:18:39+5:30

बिग बॉस १४च्या पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून पहिला स्पर्धक बेघर होणार असल्याचे समजते आहे.

Bigg Boss 14: This contestant will be homeless in the first week, the seniors made a big decision | Bigg Boss 14: पहिल्या आठवड्यात घरातून बेघर होणार हा कंटेस्टंट, सीनिअर्सनी घेतला मोठा निर्णय

Bigg Boss 14: पहिल्या आठवड्यात घरातून बेघर होणार हा कंटेस्टंट, सीनिअर्सनी घेतला मोठा निर्णय

googlenewsNext

बिग बॉसचा चौदावा सीझनला नुकतीच सुरूवात झाली असून त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. सीनिअर्स सातत्याने कंटेस्टंट्सची शाळा घेत आहे आणि त्यांचे निर्णय लादत आहेत. त्यात बिग बॉसच्या घरातील कंटेस्टंट सारा गुरपालला बेघर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती बिग बॉसच्या फॅन पेजवर देण्यात आली आहे.


बिग बॉसचा वीकेंड का वॉर शनिवारी आणि रविवारी पार पडला. पहिल्या दिवशी सलमान खानने कंटेस्टंट्सचे कौतूक केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशीच्या भागात त्याने नव्या स्पर्धकांना पद्धतशीर खेळण्याचा इशारा दिला. तसे न केल्यास पुढच्या दोन आठवड्यात घराबाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा इशारादेखील त्याने स्पर्धकांना दिला. दरम्यान, या खेळातून सारा गुरपाल बेघर झाल्याचे समजते आहे. 


'वीकेंड का वॉर'मध्ये सलमानने कंटेस्टंट्सना आपापल्या बॅगा भरून घराबाहेर जाण्यास सांगितले होते. आता यापैकी कोणी तरी एक घराबाहेर जाणार हे नक्की झाले आहे. तर, मिळालेल्या माहितीनुसार ती स्पर्धक सारा गुरपाल असण्याची शक्यता वर्तवली आहे. सारा 'बिग बॉस'च्या या पर्वाच्या घराबाहेर पडणारी पहिली स्पर्धक ठरणार आहे. तूफानी सिनिअर्सनी एकमताने साराला घराबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.


सारा गुरपाल घराबाहेर जाणार असल्याचे वृत्त समोर आले असले, तरी नेमके काय घडणार हे आजच्या भागात कळणार आहे. सारा गुरपाल बिग बॉसच्या घरात एक्टिव्ह नसल्याचे म्हणत सलमानने तिला चांगलेच खडेबोल लगावले होते. घरातील तिच्या सहकार्यावर तूफानी सिनिअर्सदेखील नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एका टास्क दरम्यान साराला 'इसमे वो बात नही' या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले होते.


'वीकेंड का वॉर'च्या सुरुवातीला कंटेस्टंट्ससह सलमान खाननेदेखील निक्की तांबोळीचे कौतुक केले. घरात सगळ्यात सक्रिय स्पर्धक निक्कीच असल्याचे सलमानने म्हटले. विशेषाधिकार मिळवण्यासाठीच्या खेळात पवित्रा पुनिया आणि निक्की तंबोली या दोघी विजेत्या ठरल्या होत्या. मात्र, बिग बॉसने दोघींपैकी एकीची निवड करण्याचा अधिकार तूफानी सिनिअर्सकडे सोपवला. यावर एकमताने निक्कीचे नाव घेतले गेल्यामुळे या पर्वात विशेषाधिकार मिळवणारी निक्की तांबोळी पहिली स्पर्धक ठरली आहे.

Web Title: Bigg Boss 14: This contestant will be homeless in the first week, the seniors made a big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.