छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसचा १३ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमधील स्पर्धकांची नावं समोर येत आहेत. त्यात आता सलमान खानची ऑनस्क्रीन बहिण नीलम कोठारी हिच्या नावाची देखील चर्चा आहे. नीलमचा नवरा समीर सोनीदेखील बिग बॉसच्या चौथ्या सीझनचे स्पर्धक होते. नीलम कोठारी हिने हम साथ साथ है चित्रपटात सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तसेच काळवीट शिकार प्रकरणात नीलम कोठारीला निर्दोष सुटका झाली होती.


बिग बॉसचा तेरावा सीझन सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीलम कोठारीला बिग बॉसच्या तेराव्या सीझनसाठी विचारण्यात आलं आहे. सूत्रांनुसार नीलमला देखील बिग बॉस शोमध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे कदाचित ती या सीझनमध्ये सहभागी होऊ शकते. 


नीलम कोठारी हिचा नवरा समीर सोनीदेखील बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. तो ९० दिवस बिग बॉसच्या घरात राहिला होतो. त्यामुळे या सीझनमध्ये नीलम कोठारीचे चाहते तिला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 


 बिग बॉस सीझन १३ मध्ये कोण कोण सहभागी होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

त्यात झरीन खान, अंकिता लोखंडे, मिमोह चक्रवर्ती, हिमांशु कोहली, सोनल चौहान या कालाकारांच्या नावांची चर्चा आहे. मात्र झरीन व अंकिता यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचं सांगितलं.


Web Title: Bigg Boss 13: salman khan on screen sister neelam kothari approached for bigg boss season 13
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.