बिग बॉसच्या तेराव्या सीझनमधील स्पर्धक रश्मी देसाई व सिद्धार्थ शुक्ला यांचे अजिबात पटत नाही. या दोघांनी घरात जशी एन्ट्री केली होती त्यावेळी त्या दोघांमधील कटूता सर्वांना पहायला मिळाली होती. जसजसा वेळ गेला तसा त्या दोघांमधील मतभेद घरातील सदस्यांसमोर आले. या दरम्यान रश्मीने सिद्धार्थ शुक्लाच्या बाबतीत बिग बॉसच्या घरात मोठा खुलासा केला. या शोमध्ये रश्मी म्हणाली की, सिद्धार्थला तिला मालिकेतून काढून टाकायचे होते.


बिग बॉसच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात दाखवले होते की, सिद्धार्थ डे, रश्मी देसाई व देवोलिना भट्टाचार्यसोबत बसून बोलताना दिसते आहे. या दरम्यान तिघांमध्ये टास्कबद्दल चर्चा सुरू असते. त्यावेळी रश्मी व सिद्धार्थच्या भांडणावर सिद्धार्थ डे व देवोलिना बोलत असतात.


रश्मी त्या दोघांना म्हणाली की, तो मला बऱ्याचदा बोलला आहे की मी तुझ्यावर उपकार केले आहेत. सिद्धार्थच्या नुसार निर्माते मला मालिकेतून काढत होते आणि त्याने तसे करू दिले नाही.

खरेतर चॅनेलमध्ये जाऊन सिद्धार्थच बोलला होता की, रश्मीला मालिकेतून काढून टाका. आम्ही खूप भांडण करत होतो. त्यामुळे चॅनेलने मीटिंग ठेवली होती. प्रोडक्शनने सांगितले होते की आम्हाला या दोघांना हॅण्डल करता येत नाही. त्यावर देवोलिना म्हणाली की, एवढी भांडणं होत होती तुमची?


त्यावर रश्मी म्हणाली की, आमचे लव सीन पाहून कुणी म्हणणार नाही की आता शिव्या देऊन बाजूला झाला आहे. तो मला शिव्यांनी मारत होता आणि मी प्रेमाने.
खरेतर रश्मी व सिद्धार्थ शुक्ला यांनी एकत्र कलर्स वाहिनीवरील 'दिल से दिल तक' मालिकेत काम केलं आहे. आता ही मालिका बंद झाली आहे. या मालिकेनंतर हे दोघे बिग बॉस १३मध्ये एकत्र आले आहेत.


बिग बॉस १३मधील टिकट टू फिनालेचा पहिला टास्क टॉय फॅक्टरी रद्द झाला आहे. बिग बॉसने घरातल्यांना टास्क रद्द झाल्यावर चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

यावेळी बिग बॉसने शोदरम्यान सांगितलं की, तुमच्या लोकांच्या या टास्कमुळे प्रेक्षकांकडून निगेटिव्ह रिएक्शन मिळाली आहे. बिग बॉसने असे सांगितल्यावर घरातील सदस्य टास्क रद्द झाल्याचा आरोप एकमेकांवर लावू लागले.

Web Title: Bigg Boss 13: Rashmi Desai makes shocking revelation about Siddhartha Shukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.