Bigg Boss 13: सलमान खानला बिग बॉससाठी मिळतात इतके पैसे, प्रत्येक भागासाठी घेतो इतके मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:46 PM2019-09-26T12:46:20+5:302019-09-26T12:52:53+5:30

सलमान खानला बिग बॉस 13 साठी तब्बल 400 कोटी रुपये मिळाले असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून मीडियात येत आहेत. पण हा आकडा चुकीचा आहे.

Bigg Boss 13: Not Rs 403 crore but Salman Khan to charge this amount | Bigg Boss 13: सलमान खानला बिग बॉससाठी मिळतात इतके पैसे, प्रत्येक भागासाठी घेतो इतके मानधन

Bigg Boss 13: सलमान खानला बिग बॉससाठी मिळतात इतके पैसे, प्रत्येक भागासाठी घेतो इतके मानधन

googlenewsNext
ठळक मुद्देया सिझनसाठी सलमानने त्याचे मानधन थोडेसे वाढवले आहे. आता तो प्रत्येक चित्रीकरणासाठी 13 करोड रुपये घेणार आहे. म्हणजेच तो 195 कोटी इतके मानधन या संपूर्ण सिझनचे घेणार आहे. 

बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन चांगलेच गाजले आहेत. आता या कार्यक्रमाचा 13 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनची घोषणा झाल्यापासून या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या कार्यक्रमाची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत झाली. यावेळी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि प्रेक्षकांच्या लाडक्या भाईजानने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. 

सलमान खान आणि बिग बॉस हे एक आता समीकरण बनले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सलमानशिवाय बिग बॉसचा लोक विचार देखील करू शकत नाहीत. सलमानला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी किती मानधन मिळते हे ऐकले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. सलमान खानला बिग बॉस 13 साठी तब्बल 400 कोटी रुपये मिळाले असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून मीडियात येत आहेत. पण सलमानला 400 नव्हे तर 195 कोटी रुपये इतके मानधन मिळणार असल्याचे पिंकव्हिलाने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. 

त्यांनी त्यांच्या वृत्तात लिहिले आहे की, सलमानने गेल्या सिझनच्या प्रत्येक शूटसाठी 11 करोड रुपये घेतले होते. सलमान विकेंडच्या दोन्ही भागांचे चित्रीकरण एकाच दिवशी करतो. हा कार्यक्रम 105 दिवसांचा म्हणजेच 15 आठवड्यांचा असतो आणि त्यामुळे त्याला गेल्या सिझनमध्ये 165 करोड रुपये मिळाले होते आणि आता या सिझनसाठी त्याने त्याचे मानधन थोडेसे वाढवले आहे. आता तो प्रत्येक चित्रीकरणासाठी 13 करोड रुपये घेणार आहे. म्हणजेच तो 195 कोटी इतके मानधन या संपूर्ण सिझनचे घेणार आहे. 

बिग बॉस 13 हा कार्यक्रम 29 सप्टेंबरला सुरू होणार असून या कार्यक्रमात छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. यावेळेचे बिग बॉसचे घर देखील हटके असून म्युझियम अशी या सिझनची थिम आहे. त्यामुळे यंदाचा सिझन आतापर्यंतच्या सगळ्या सिझनपेक्षा खूप वेगळा असणार आहे. 

Web Title: Bigg Boss 13: Not Rs 403 crore but Salman Khan to charge this amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.