bigg boss 13 fans trend staystrongrashamidesai after salman khan reveals arhaan khan truth | Bigg Boss13 : अरहानची पोलखोल; चाहते म्हणाले, StayStrongRashamiDesai  

Bigg Boss13 : अरहानची पोलखोल; चाहते म्हणाले, StayStrongRashamiDesai  

ठळक मुद्देअरहान व रश्मी ‘बिग बॉस’च्या घरात साखरपुडा करणार, अशी चर्चा होती.

बिग बॉस 13’मध्ये सध्या फुल्ल ऑन   ड्रामा बघायला मिळतो आहे. असे असले तरी काल वीकेंडच्या डावमध्ये जे काही झाले ते पाहून अनेकांना धक्का बसला. होय, या एपिसोडमध्ये सलमानने असा काही खुलासा केला की, ‘बिग बॉस 13’च्या घरातील स्पर्धकांनाच नाही तर चाहत्यांनाही जोरदार धक्का बसला. सर्वाधिक धक्का बसला तो रश्मी देसाईला. सलमानने जे काही सांगितले त्यानंतर रश्मी अक्षरश: हुंदके देत रडू लागली. तिला त्या अवस्थेत बघून अखेर सलमान स्वत: ‘बिग बॉस’ घरात आला आणि त्याने रश्मीला सावरले.
सलमानने असा काय खुलासा केला, तर अरहानबद्दल. होय, रश्मीला ‘बिग बॉस 13’च्या घरात प्रपोज करणाºया अरहानची सलमानने पोलखोल केली. अरहान हा आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मुलही आहे, असा धक्कादायक खुलासा सलमानने केला. सलमानचे हे शब्द ऐकून रश्मीच्या पायाखालची जमीन सरकली. ती ढसाढसा रडू लागली. रश्मीची ही अवस्था बघून सलमान स्वत: बिग बॉसच्या घरात गेला आणि त्याने तिला जवळ घेत, धीर दिला.
रश्मीचे हे ब्रेकडाऊन बघून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. सोशल मीडियावरही याच्या प्रतिक्रिया उमटल्या. अरहानचा खोटेपणा जगापुढे आल्यानंतर अनेक चाहत्यांनी रश्मीला यास्थितीत खंबीर राहण्याचा सल्ला दिला.

काहीच वेळात #StayStrongRashamiDesaiहा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी रश्मीला पाठींबा दिला. केवळ इतकेच नाही तर अरहानही पोल खोलणा-या सलमानचेही चाहत्यांनी कौतुक केले. आज सलमानने केवळ एका होस्टचे नाही तर एका मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.अरहान व रश्मी ‘बिग बॉस’च्या घरात साखरपुडा करणार, अशी चर्चा होती. यामुळेच त्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. रश्मीबद्दल सांगायचे तर, रश्मीने लहानपणीच आपल्या वडिलांना गमावले. यानंतर घर चालवण्यासाठी वयाच्या 15 व्या वर्षांपासून रश्मी काम करू लागली. काही वर्षांपूर्वी तिने अभिनेता नंदिश संधूसोबत लग्न केले होते. मात्र तीनच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bigg boss 13 fans trend staystrongrashamidesai after salman khan reveals arhaan khan truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.