बिग बॉसच्या १३ व्या सीझनमधील संस्कारी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीशेफाली बग्गा यांच्यात नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात कॅटफाइट पहायला मिळाली. नॉमिनेशन टास्कदरम्यान टीम एचा बचाव करताना देवोलिनामध्ये खूप एग्रेशन पहायला मिळालं. तिने आपल्या टीमला जिंकवण्यासाठी खूप प्रयत्न केले. इतकंच नाही तर शेफाली बग्गाशी दोन हात केले. 


खरेतर टास्कदरम्यान देवोलिनी आणि रश्मीने निर्णय घेतला की ते लॉकर तोडून दुसऱ्या टीमचे पैसे चोरणार. आपल्या टीमचा लॉकरचे संरक्षण करताना शेफाली देवोलिनाला रोखू लागली.  


देवोलिना आणि रश्मी डंबेल घेऊन लॉकर तोडायला गेली होती. खरेतर ते मस्करी करत होते. कारण लॉकर तोडणे म्हणजे बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन झाले असते. मात्र ही मस्करी गंभीर झाली आणि देवोलिना आणि शेफाली खूप एग्रेसिव्ह झाल्या. शेफाली देवोलिनाच्या हातून डंबेल्स काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होती.

यादरम्यान शेफाली व देवोलिनामध्ये धक्काबुक्की झाली. देवोलिनाने शेफालीवर अटॅक केला. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.


सोशल मीडियावर देवोलिनाचा एग्रेसिव्ह मोड पाहून एका युजरने लिहिलं की, बहू बनली बेब्स, आता बेब्स बनली रेसलर.


काही लोकांना देवोलिनाचे शेफाली बग्गासोबत भांडण करणे समजले नाही तर काहींना देवोलिनाचा टास्क खेळण्याचा अंदाज खूप आवडतो आहे.


देवोलिनाचा बिग बॉसच्या घरातील ऑन स्क्रीन इमेज खूप वेगळी दिसते आहे. ती बिग बॉसच्या घरातील पहिली क्वीन बनली आहे आणि नॉमिनेशनपासूनही सुरक्षित आहे. तिने तिच्या टास्कमध्ये शंभर टक्के दिले आहेत.

Web Title: Bigg Boss 13: Catfight in Devoleena and Shefali at Bigg boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.