Bigg Boss 13: At The Age 12 Madhurima Tuli Sexually Harrassed By His Tutor | Bigg Boss 13:अवघ्या 12 वर्षाची असतानाच झाले होते या अभिनेत्रीचे लैंगिक शोषण, आईनेच केला या गोष्टीचा खुलासा

Bigg Boss 13:अवघ्या 12 वर्षाची असतानाच झाले होते या अभिनेत्रीचे लैंगिक शोषण, आईनेच केला या गोष्टीचा खुलासा

दरदिवशी चित्रपटसृष्टीतील कुणी ना कुणी आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून वाचा फोडत आहेत.अशीच एक अभिनेत्रीनेही तिची आपबीती सांगितली आहे. 'बिग बॉस 13' ची स्पर्धक मधुरिमा तुलीने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीतमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. याविषयावर मधुरिमाच्या आईनेही पहिल्यांदाच मोकळेपणाने मधुरिमासह घडलेल्या  प्रसंगाविषयी सांगितले. मधुरिमाच्या आईने सांगितले की, मधुरिमा याविषयी गप्प न राहता आज मोकळेपणाने बोलते ही गोष्ट तिच्यासाठी आणि इतरांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. कधीच आपल्यावरील अत्याचार सहन करत बसू नका, समोर येऊन यावर भाष्य करणे गरजेचे आहे.


आईने पुढे सांगितले की, मधुरिमाससह असे काही घडले हे कळताच माझ्याही पाया खालची जमीन घसरली होती. काय करावे काय करू नये काहीच सुचत नव्हते. यावेळी मुलीला सांभाळणे तिची काळजी घेणे, तिला धैर्य देने, यातून बाहेर पडण्यास तिला योग्य ते मार्गदर्शन केले. आजही मधुरिमा त्या घटनेला विसरलेली नाही. मधुरिमा सहावीत शिकत होती.

 

त्यावेळी भावासाठी आणि मधुरिमासाठी घरीच शिकवणीसाठी ट्युटर यायचा. काही वेळानंतर मधुरिमा रूममधून बाहेर यायची. ती सांगायची की ट्युटर तिच्या पायाला चिमटा घेतोय. पण त्यावेळी मला वाटायचे की, मधुरिमा आभ्यासातून पळ काढण्यासाठी असे करत असावी. त्यामुळे दुर्लक्ष केले. मात्र काही दिवसांनीच लक्षात आले की, ट्युटर तिची छेड काढत आहे. हे समजताच त्याच दिवशी त्यांची शिकवणी बंद करून टाकली.          

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 13: At The Age 12 Madhurima Tuli Sexually Harrassed By His Tutor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.