'बिग बॉस १२' फेम शिवाशिष मिश्रावर कोसळला दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 07:40 PM2019-09-03T19:40:03+5:302019-09-03T19:40:24+5:30

लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो बिग बॉसच्या सीझन १२ चा स्पर्धक शिवाशिष मिश्रा वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जातो. मात्र आता त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

'Bigg Boss 12' fame shivashish Mishra's father passed away | 'बिग बॉस १२' फेम शिवाशिष मिश्रावर कोसळला दुःखाचा डोंगर

'बिग बॉस १२' फेम शिवाशिष मिश्रावर कोसळला दुःखाचा डोंगर

googlenewsNext


लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो बिग बॉसच्या सीझन १२ चा स्पर्धक शिवाशिष मिश्रा वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जातो. मात्र आता त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचं काल (२ सप्टेंबर) निधन झालं आहे. त्यानेच ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. 


शिवाशिषने सोशल मीडियावर वडिलांचा फोटो शेअर करीत भावूक नोट लिहिली आहे. त्याच्या वडिलांचं निधन कसं झालं हे अद्याप समजू शकलेलं नाही. 


शिवाशिषने सोशल मीडियावर लिहिले की, त्यांनी मला नाही सांगितलं की, कसं जगायचं, याशिवाय ते जगले. RIP पप्पा. माझी प्रेरणा, माझे लक्ष्य, नेहमी आणि नेहमी माझ्या मनात तुमचं स्थान कायम राहणार. जय श्री महकलेश्वर.
शिवाशिष मिश्राच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर छोट्या पडद्यावरील कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. श्रीसंत, करणवीर बोहरा, रोमिल चौधरी व दीपक ठाकूर यांच्यासोबत काही कलाकारांनी दुःख व्यक्त केलं. 


श्रीसंतने लिहिलं की, मॅसेजच्या माध्यमातून भावना व्यक्त करू शकत नाही. मी हे म्हणू शकतो की वास्तविकमध्ये तू स्ट्राँग व्यक्ती आहेस. तुझं मन खूप चांगलं आहे. तुझ्या वडिलांचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. मजबूत बन. पालक आपले खरे दैवत असतात. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. तू तुझ्या कुटुंबासाठी बेस्ट व्यक्ती आहेस.


तर करणवीर बोहरा म्हणाला की, ओह नो... ओम नमो शिवाय. ते चांगल्या जागी असतील भावा.


रोमिल चौधरीने लिहिलं की, हे वृत्त ऐकून खूप वाईट वाटलं. देव त्यांच्या आत्माला शांती देवो. मला माहित आहे की दुःख कोण समजू शकत नाही पण स्ट्राँग बन. 
दीपक ठाकूरनं म्हटलं की देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ओम नम: शिवाय.

Web Title: 'Bigg Boss 12' fame shivashish Mishra's father passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.