Bigg Boss 11 Winner Shilpa Shinde is Trending on Twitter | असे काय झाले की शिल्पा शिंदे अचानक आली टॉप ट्रेंडमध्ये?
असे काय झाले की शिल्पा शिंदे अचानक आली टॉप ट्रेंडमध्ये?

ठळक मुद्दे‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत शिल्पा शिंदेने साकारलेली अंगूरी भाभीची भूमिका प्रचंड लोेकप्रिय झाली होती.

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेची अंगुरी भाभी अर्थात शिल्पा शिंदे  स्पर्धक बनून ‘बिग बॉस’च्या घरात गेली आणि बिग बॉसची ट्रॉफी जिंकूनच घराबाहेर आली. या शोने शिल्पाला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. या शोमधून बाहेर पडल्यानंतर काही दिवस शिल्पा कायम चर्चेत होती. पण हळूहळू तिची चर्चा थांबली. पण कालपरवापासून ती पुन्हा चर्चेत आली. केवळ चर्चेत नाही तर तिचे नाव ट्विटरवरवर टॉप ट्रेंडमध्ये आले.  
खरे तर शिल्पा सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह अशी नाही. मग अचानक ती ट्रेंड होण्याचे कारण काय तर नुसते एक ट्विट. होय, या महिन्यात म्हणजे येत्या 28  ऑगस्टला शिल्पा शिंदेचा वाढदिवस आहे. तिच्या एका चाहत्याने ट्विटरवर या महिन्यात शिल्पाचा वाढदिवस आहे, असे एक साधे ट्विट केले आणि मग काय, वाढदिवस राहिला मागे अन् चाहत्यांनी तिच्या कामाचे कौतुक करणे सुरु केले. विशेषत: बिग बॉसच्या घरातील तिच्या कामगिरीचे चाहत्यांनी वारेमाप कौतुक केले. मग एका पाठोपाठ एक अशा तिच्या कौतुकाने भरलेल्या ट्विटचा पाऊस सुरु झाला आणि शिल्पा शिंदे ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये आली.
एकंदर काय तर शिल्पाच्या वाढदिवसाचा उल्लेख झाला आणि नुसत्या त्या एका ट्विटने शिल्पा टॉप ट्रेंडमध्ये आली.
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत शिल्पा शिंदेने साकारलेली अंगूरी भाभीची भूमिका प्रचंड लोेकप्रिय झाली होती. निर्मात्यांसोबतच्या वादामुळे शिल्पाने ही मालिका मध्येच सोडली होती. यानंतर तिच्या जागी शुभांगी अत्रेची वर्णी लागली होती. ‘भाभीजी घर पर है’सोडल्यानंतर शिल्पा शिंदे ‘बिग बॉस11’मध्ये दिसली. केवळ दिसलीच नाही तर हा शो तिने जिंकला.

 
 

Web Title: Bigg Boss 11 Winner Shilpa Shinde is Trending on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.