Bigg Boss Marathi 3 Upadate: घरामध्ये रंगणार आगळावेगळा टास्क, कोण आहे घरातील Lady Bigg Boss ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 05:20 PM2021-11-26T17:20:40+5:302021-11-26T17:21:41+5:30

विकास या टास्कमध्ये एकंरिंक करणार आहे असे दिसून येते आहे. विकासने मीराला स्टेजवर आमंत्रित करण्यासाठी काही खास वाक्य तयार केली गेली

Big Boss Marathi 3 update: Unique task on the way, who will be lady big Boss, check details | Bigg Boss Marathi 3 Upadate: घरामध्ये रंगणार आगळावेगळा टास्क, कोण आहे घरातील Lady Bigg Boss ?

Bigg Boss Marathi 3 Upadate: घरामध्ये रंगणार आगळावेगळा टास्क, कोण आहे घरातील Lady Bigg Boss ?

googlenewsNext


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस आज सदस्यांना भन्नाट टास्क देणार आहेत.बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे आगळावेळा टास्क.बिग बॉस यांनी एखादा टास्क सदस्यांवर सोपावला की त्यांच्यात डील होणे हे आलेच. आज असंच काहीसं घरात घडणार आहे.टास्कसाठी सगळेच सदस्य सज्ज आहेत.

 ज्यासाठी सदस्य आहेत पुर्णपणे सज्ज. पूर्ण तयारी करून घरातील सदस्य या टास्कसाठी मैदानात उतरणार आहेत. एकीकडे नृत्य तर दुसरीकडे विकासचा पपेट शो आहे चर्चेमध्ये. या टास्क दरम्यान गायत्री आणि मीराचे जोरदार भांडण देखील होणार आहे. घरात या दोन  जिवाभावाच्या मैत्रिणी समजल्या जात होत्या.गायत्रीच्या एका निर्णयामुळे यांची मैत्री तुटणार ? नक्की काय झाले? या वादावादीमध्ये गायत्रीचा देखील पारा चढला आणि भांडण अजूनच वाढत गेले. आरडाओरडा कमी कर…बस चल तिकडे. आणि यानंतर वाद वाढतच गेला. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी गायत्रीला तिचा निकाल जाहीर करण्यास सांगितला. कुठली टीम ठरणार विजयी ? हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.
 
विकास या टास्कमध्ये एकंरिंक करणार आहे असे दिसून येते आहे. विकासने मीराला स्टेजवर आमंत्रित करण्यासाठी काही खास वाक्य तयार केली गेली.तो म्हणाला, या घरातल्या तडकाफडकी ज्यांना आपण या घरातली मिरची किंवा Lady Bigg Boss देखील म्हणतो त्या आहेत मीरा जगन्नाथ. गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत...”बघूया टास्कमध्ये घरातील सदस्यांनी काय काय धम्माल मस्ती केली आणि किती राडे केले ते आजच्या भागामध्ये पाहायला मिळेल.

Web Title: Big Boss Marathi 3 update: Unique task on the way, who will be lady big Boss, check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.