भाऊ कदमला वाढदिवसाचे मिळाले अनोखे गिफ्ट, 50 वा वाढदिवस असा केला सेलिब्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 10:24 AM2020-03-03T10:24:49+5:302020-03-03T10:25:48+5:30

भाऊ कदमसाठी त्याच्या मित्र परिवाराकडून त्याच्यासाठी खास सरप्राईज पार्टी दिली. निमित्त होते त्याच्या 50 व्या वाढदिवसाचे कुटुंबासह जवळच्या नातेवाईक मित्रांसह त्याने त्याचा हा खास दिवस साजरा केला.

Bhau Kadam GRAND 50th Birthday Celebration 2020 | भाऊ कदमला वाढदिवसाचे मिळाले अनोखे गिफ्ट, 50 वा वाढदिवस असा केला सेलिब्रेट

भाऊ कदमला वाढदिवसाचे मिळाले अनोखे गिफ्ट, 50 वा वाढदिवस असा केला सेलिब्रेट

googlenewsNext

‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे भालचंद्र कदम म्हणजे रसिकांचा लाडका भाऊ कदम. आपला अभिनय आणि कॉमेडीच्या भन्नाट टायमिंगने रसिकांची मनं भाऊ कदम यांनी जिंकली आहेत. नेहमीच इतरांच्या चेह-यावर हसून फुलवणा-या भाऊ कदमसाठी त्याच्या मित्र परिवाराकडून त्याच्यासाठी खास सरप्राईज पार्टी दिली. निमित्त होते त्याच्या 50 व्या वाढदिवसाचे कुटुंबासह जवळच्या नातेवाईक मित्रांसह त्याने त्याचा हा खास दिवस साजरा केला. 

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=10156803431106175&id=694361174


ढोला ताशाचा गजरात त्याचा वाढिदवस साजरा करण्यात आला. सा-यांकडून मिळालेले हे प्रेम पाहून भाऊ खूपच भारावला होता. खुद्द दिग्दर्शक रवी जाधवने या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाढदिवसानिमित्त भाऊवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फॅन्ससह सेलिब्रिटींकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. 

 

 

भाऊच्या करियरमधील प्रत्येक चढउतारा दरम्यान त्याची पत्नी ममता कदम त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी ठाकली. भाऊ आणि ममता यांच्या सुखी संसारात त्यांच्या तीन मुलीही आहेत. मृण्मयी, संचिती आणि समृद्धी अशी भाऊच्या लाडक्या लेकींची नावं आहेत. शुटिंग नसताना निवांत क्षण भाऊ आपल्या लेकींसह एन्जॉय करतो. इतकं यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही भाऊ कदममधील साधेपणा आजही कायम आहे. आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत. त्यामुळेच साधी राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे भाऊ कदम आज रसिकांचा लाडका बनला आहे. त्यामुळे रसिकही मोठ्या अभिमानाने म्हणतात भाऊ कदम रॉक्स !    

Web Title: Bhau Kadam GRAND 50th Birthday Celebration 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.