बालपणीच हरपलं वडिलांचं छत्र, या अभिनेत्रीच्या आईने जीवे मारण्याचा केला होता प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 04:24 PM2019-07-03T16:24:03+5:302019-07-03T16:25:38+5:30

दोन वर्षांची असताना या कॉमेडी क्वीनच्या वडीलांचे निधन झाले.

bharti singh birthday special life journey struggles unknown facts | बालपणीच हरपलं वडिलांचं छत्र, या अभिनेत्रीच्या आईने जीवे मारण्याचा केला होता प्रयत्न

बालपणीच हरपलं वडिलांचं छत्र, या अभिनेत्रीच्या आईने जीवे मारण्याचा केला होता प्रयत्न

कॉमेडी क्वीन भारती सिंग आज वाढदिवस असून भारती सिंगचा ३ जुलै, १९८४ साली अमृतसरमध्ये जन्म झाला. भारती सिंग अशी कॉमेडियन आहे जिने आपल्या जीवनात बरेच चढउतार पाहिले आहेत. बालपणापासून वेदना आणि डोळ्यांत आसवं घेऊन मोठी झालेली भारती सिंग आता देशभरातील लोकांच्या चेहऱ्यावर हासू आणण्याचं काम करते आहे. भारती सिंगच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या जीवनाबद्दल.

एका गरीब कुटुंबात जन्मलेली भारती सिंग तिच्या कुटुंबात सर्वात लहान आहे. भारतीने कित्येक शोजमध्ये सांगितलं की, जेव्हा ती आईच्या पोटात होती. त्यावेळी गरीबी असल्यामुळे तिची आई तिला गर्भातच संपवण्याचा प्रयत्न केला होता. भारतीच्या आईनं तिला पोटातच संपवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण नियतीला काही वेगळंच हवं होतं. आईच्या प्रयत्नानंतरही भारतीचा जन्म झाला. भारतीनं हेदेखील सांगितलं की तिच्या जन्मनंतर तिच्या आईने तिच्यावर खूप प्रेमानं वाढवलं.


भारती सिंग जेव्हा दोन वर्षांची होती तेव्हा तिच्या वडीलांचा मृत्यू झाला. भारतीच्या आईने एका फॅक्टरीत काम करून तिन्ही मुलांचं पालन पोषण केलं. भारतीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, माझी आई फॅक्टरीत काम करत होती आणि घरी येऊन उरलेले काम करायची. घरात दिवसरात्र मशीनचा आवाज ऐकून माझं बालपण गेलं आहे. जेव्हा मी रोडवर असा आवाज ऐकते तर मी त्रस्त होते.


घरातल्या अडचणींपासून पळण्यासाठी ती एनसीसी कॅम्पला जायची. पैसे कमवण्याच्या उद्देशानं भारती ठिकठिकाणी ऑडिशन देत होती. भारतीचे टॅलेंट सुदेश लहरी यांनी ओळखले. त्यांनी भारतीला एनसीसी कॅम्पदरम्यान पार्कमध्ये अभिनय करताना पाहिलं आणि इंम्प्रेस होऊन त्यांनी तिला पहिला रोल ऑफर केला.


भारतीच्या करियरमध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज टर्निंग पॉइंट ठरला. या शोमधून भारतीला कॉमेडीयन म्हणून ओळख मिळाली आणि या शोमुळे तिच्या करियरला नवीन दिशा मिळाली. त्यानंतर भारती कॉमेडी सर्कसच्या काही सीझनची भाग होती. कॉमेडी व्यतिरिक्त भारतीने डान्स रिएलिटी शो झलक दिखला जा आणि आय कॅन डू दॅटमध्ये सहभागी झाली होती. डान्स व कॉमेडी सोबत भारतीने सूत्रसंचालनामध्ये आपलं नशीब आजमावलं. 


भारतीने ३ डिसेंबर, २०१७ साली स्क्रीप्ट राइटर हर्ष लिम्बाचिया सोबत लग्न केलं.

ते दोघं पहिल्यांदा कॉमेडी शोच्या सेटवर भेटले होते. या शोदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Web Title: bharti singh birthday special life journey struggles unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.