​'संस्कृती कला दर्पण' पुरस्कार सोहळ्यात स्टार प्रवाहची 'नकळत सारे घडले' ठरली सर्वोत्कृष्ट मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 10:39 AM2018-05-08T10:39:08+5:302018-05-08T16:09:08+5:30

मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांचा गौरव करणारा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ ...

The best series in 'Cultura Art Mirror' award ceremony has been 'Unknowingly done' | ​'संस्कृती कला दर्पण' पुरस्कार सोहळ्यात स्टार प्रवाहची 'नकळत सारे घडले' ठरली सर्वोत्कृष्ट मालिका

​'संस्कृती कला दर्पण' पुरस्कार सोहळ्यात स्टार प्रवाहची 'नकळत सारे घडले' ठरली सर्वोत्कृष्ट मालिका

googlenewsNext
ाठी चित्रपट, नाटक आणि मालिकांचा गौरव करणारा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. स्टार प्रवाहची 'नकळत सारे घडले' ही मालिका सर्वोत्कृष्ट ठरली तर विठूमाऊली ठरली लक्षवेधी मालिका. स्टार प्रवाहच्या इतर मालिकांनीही विविध विभागांमध्ये पुरस्कार पटकावले.
अर्चना नेवरेकर फाऊंडेशनतर्फे दरवर्षी संस्कृती कलादर्पण पुरस्कार देण्यात येतात. यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या रंगारंग सोहळ्यात कलाकारांनी  दमदार परफॉर्मन्स सादर केले. सई देवधरची ठसकेबाज लावणी आणि गश्मीर महाजनीच्या रॉकिंग परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. तर मानसी नाईकच्या घुमरने उपस्थितांची दाद मिळवली. या सोहळ्यात स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनीही लक्षवेधी नृत्याविष्कार सादर केला. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अक्षर कोठारी, ऐतशा संझगिरी, रुपल नंद, समीर परांजपे, ज्ञानदा रामतीर्थकर, गौरव घाटणेकर, अजिंक्य राऊत, एकता लब्दे, सायली देवधर आणि विकास पाटील यांच्या परफॉर्मन्सने सोहळ्याची रंगत आणखी वाढली.
नकळत सारे घडले या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेसह सर्वोत्कृष्ट अभिनेता (हरीश दुधाडे), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नुपूर परुळेकर) असे पुरस्कार पटकावले. दमदार परफॉर्मन्सेस असलेला हा रंगारंग सोहळा आपल्याला लवकरच स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.
नकळत सारे घडले या मालिकेची मूळ संकल्पना स्टार प्रवाह क्रिएटिव्ह टीमची आहे. तर अभिनेता स्वप्निल जोशीच्या जिसिम्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट या मालिकेत उलगडली जात आहे. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अनुराधा राजाध्यक्ष, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची अशा उत्तम स्टारकास्टची निवड स्टार प्रवाहने या मालिकेसाठी केली असून या सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेचा प्रोमो सुरू झाल्यापासूनच या मालिकेतील छोटी परी प्रचंड चर्चेत आहे. ही परी प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली असल्याचे प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात.

Also Read : नकळत सारे घडले या मालिकेतील परीची १०० मुलांच्या ऑडिशनमधून झाली निवड 

 

Web Title: The best series in 'Cultura Art Mirror' award ceremony has been 'Unknowingly done'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.