मालिकेतील लग्नात इतका खतरनाक ट्विस्ट तुम्ही कधीच पाहिला नसेल, पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:25 PM2022-05-19T17:25:22+5:302022-05-19T17:27:22+5:30

Social Viral : या मालिकेतील लग्नाच्या सेगमेंटमध्ये असा ट्विस्ट टाकण्यात आला की, सोशल मीडियावरील लोक याची खिल्ली उडवत आहेत. या लग्नाच्या सीनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Bengali show aye tobe sohochori wedding funny scene viral must watch clip trolling | मालिकेतील लग्नात इतका खतरनाक ट्विस्ट तुम्ही कधीच पाहिला नसेल, पोट धरून हसाल

मालिकेतील लग्नात इतका खतरनाक ट्विस्ट तुम्ही कधीच पाहिला नसेल, पोट धरून हसाल

googlenewsNext

टीव्ही मालिकांच्या दुनियेत कल्पनांना काही लिमिट नसतं. कधीही काहीही दाखवलं जाऊ शकतं. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यासाठी, त्यांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकांमध्ये खतरनाक ट्विस्ट दाखवले जातात. असे ट्विस्ट खासकरून लग्नाच्या सीनमध्ये जास्त असतात. एका बंगाली मालिकेतील असाच एक सीन सध्या व्हायरल झाला आहे.

या मालिकेतील लग्नाच्या सेगमेंटमध्ये असा ट्विस्ट टाकण्यात आला की, सोशल मीडियावरील लोक याची खिल्ली उडवत आहेत. या लग्नाच्या सीनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा सीन इतका फनी आहे की, तुम्ही पोट धरून हसू लागाल. 
सीन असा आहे की, लग्न सुरू आहे. नवरी-नवरदेव एकमेकांच्या गळ्यात हार घालणार आहेत. अशात अचानक मागून एक तरूण नवरदेवाला धक्का देतो. इथेच सर्वात मोठा ट्विस्ट येतो. जो बघून सगळे लोक हैराण होतात. धक्का दिल्यावर नवरदेव एका बाजूला जातो आणि नवरी त्याच्याऐवजी धक्का देणाऱ्या तरूणाच्या गळ्यात हार टाकते.

आहे ना जबरदस्त ट्विस्ट....यानंतर ज्याच्या गळ्यात चुकून हार टाकला जातो तो तरूण नवरदेवाच्या हातातील हार घेतो आणि नवरीच्या गळ्यात टाकतो. हे इतक्यावरच थांबतं असं नाही. या लग्नात आणखी धमाका बाकी आहे. लग्नातील लोकांकडे पाहिलं तर वाटतं की, त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर तरूण नवरीच्या भांगेत कुंकू भरतो. हे बघून खरा नवरदेव आणि लोक शॉक्ड होतात. 

शंबर टक्के तुम्ही याआधी कोणत्याही मालिकेत इतका खतरनाक ट्विस्ट पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहून लोक पोटधरून हसत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, विचार करा की, फोटोग्राफरचं काय होणार....आता त्यांना एक्स्ट्रा फी घ्यावी लागेल. 
 

Web Title: Bengali show aye tobe sohochori wedding funny scene viral must watch clip trolling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.