बालिका वधूचा जग्या म्हणजेच अविनाश मुखर्जी पडला या मॉडेलच्या प्रेमात, दिली प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 02:03 PM2019-07-27T14:03:38+5:302019-07-27T14:05:08+5:30

अविनाश मुखर्जी सध्या मालिकेत काम करत नसला तरी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

Balika Vadhu's Jagya Aka Avinash Mukherjee Finds His REAL LIFE Anandi, CONFIRMS DATING Saloni Luthra | बालिका वधूचा जग्या म्हणजेच अविनाश मुखर्जी पडला या मॉडेलच्या प्रेमात, दिली प्रेमाची कबुली

बालिका वधूचा जग्या म्हणजेच अविनाश मुखर्जी पडला या मॉडेलच्या प्रेमात, दिली प्रेमाची कबुली

googlenewsNext
ठळक मुद्देअविनाश सलोनी लुथरासोबत नात्यात असून सलोनी ही मिस तियारा 2019 ची रनर अप आहे. 

बालिका वधू या मालिकेला एकेकाळी चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेची कथा प्रेक्षकांना भावली होती. पण त्याचसोबत या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या होत्या. या मालिकेला आज अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेतील आनंदी आणि जग्या आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. या मालिकेत आनंदीची भूमिका अविका गौरने तर जग्याची भूमिका अविनाश मुखर्जीने साकारली होती.

अविनाश मुखर्जी सध्या मालिकेत काम करत नसला तरी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अविनाश एका मॉडेलसोबत नात्यात असल्याचे त्यानेच नुकत्याच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.अविनाश सलोनी लुथरासोबत नात्यात असून सलोनी ही मिस तियारा 2019 ची रनर अप आहे. 

अविनाशने आपल्या नात्याविषयी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, माझ्या कंपनीसाठी काही लिखाण करण्यासाठी सलोनीला मी इन्स्टाग्रामला मेसेज केला होता. आम्ही दोघे कॉलेजमध्ये एकत्र असल्याने तिचे लिखाण खूपच चांगले असल्याची मला कल्पना होती तर सलोनीने याविषयी सांगितले आहे की, या कामासाठी मी अविनाशला काहीजणांची नावे सुचवली होती. पण हे काम मीच करावे असे त्याला वाटत होते. काही भेटींनंतर आमच्या लक्षात आले की, आम्ही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट असून आम्ही नकळतपणे एकमेकांच्या प्रेमात पडलो. 

बालिका वधू या मालिकेतील अविनाशची भूमिका प्रचंड गाजल्याने त्याला आजही जग्या म्हणूनच ओळखले जाते. पण सलोनीला त्याच्या या मालिकेविषयी माहीतच नव्हते. याविषयी सलोनीने मुलाखतीत सांगितले आहे की, मी त्याच्या घरी गेले असता मला त्याच्या घरात खूप सारे पुरस्कार दिसले होते. ते पाहून मला त्याच्या मालिकेविषयी आणि त्याच्या स्टार असण्याविषयी कळले. मी त्याच्यावर जग्या म्हणून नव्हे तर अविनाश म्हणून प्रेम करते याचा मला जास्त आनंद आहे.

अविनाशने बालिकावधू या मालिकेनंतर मन में है विश्वास, इतना करो ना मुझसे प्यार यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते.  

Web Title: Balika Vadhu's Jagya Aka Avinash Mukherjee Finds His REAL LIFE Anandi, CONFIRMS DATING Saloni Luthra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.