ठळक मुद्देतनाझ बख्तियारपेक्षा सात वर्षांनी मोठी असून तिचे पहिले लग्न झालेले होते.

तनाझ इराणी आणि बख्तियार इराणी हे टीव्हीचे लोकप्रिय कपल आहे. दोघांचीही केमिस्ट्री शानदार आहे. खरे तर या कपलच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झालीत. पण त्यांच्यातील प्रेम आजही तितकेच ताजे टवटवीत आहे. याचा पुरावा म्हणजे, बख्तियारच्या पाठीवरचा तनाझचा फेस टॅटू.
बख्तियारने आपल्या पाठीवर पत्नी तनाझचा फेस टॅटू गोंदवला आहे. हा टॅटू गोंदवण्यासाठी त्याला सात तासांचा वेळ लागला. या टॅटूचे फोटो व व्हिडीओ त्याने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.

याबद्दल बख्तियार सांगतो, ‘ माझ्या शरीरावर तनाझचा चेहरा असावा, अशी माझी इच्छा होती. खरे तर कॉलेजमध्ये असतानाच मी हे ठरवले होते. मी जेव्हाकेव्हा लग्न करणार, तेव्हा माझ्या पत्नीचा चेहरा माझ्या शरीरावर गोंदवणार, असे तेव्हाच मी ठरवले होते. पण इतक्या वर्षांत कधीच ही इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही.

पण अलीकडे आम्ही अचानक ट्रिप प्लान केली. या ट्रिपमध्ये ही इच्छा पूर्ण करण्याचा मी निर्धार केला. तनाझच्या चेह-याचा टॅटू बनवण्यासाठी सात तास लागले. प्रचंड वेदना, डोळ्यांत अश्रू होते. पण हा टॅटू मला वेगळाच आनंद देऊन गेला,’ असे त्याने सांगितले.  हा टॅटू गोंदवताना पहिल्यांदा मला तनाजच्या कुरळ्या केसांचा राग आला, असेही तो हसत हसत म्हणाला.


तनाझ बख्तियारपेक्षा सात वर्षांनी मोठी असून तिचे पहिले लग्न झालेले होते. तिला एक मोठी मुलगीदेखील होती. बख्तियारने तनाझसोबत लग्न करू नये असे त्याच्या घरातल्यांना वाटत होते. पण बख्तियार त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि आपला निर्णय कशाप्रकारे योग्य आहे हे त्याने त्याच्या कुटुंबीयांना पटवून दिले.


Web Title: bakhhtyar irani gets a tattoo of wife tannaz irani face on his back
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.