​उर्मिला कानेटकर कोठारेने चला हवा येऊ द्याच्या मंचावर सादर केला एरियर सिल्क डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 03:59 PM2017-01-06T15:59:43+5:302017-01-06T15:59:43+5:30

उर्मिला कानेटकर कोठारे ही एक चांगली अत्रिनेत्री असण्यासोबतच एक चांगली नर्तिकादेखील असल्याचे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. उर्मिला नवनवीन नृत्यप्रकाराचे ...

Arari Silk Dance presented on the platform of Urmila Kanetkar | ​उर्मिला कानेटकर कोठारेने चला हवा येऊ द्याच्या मंचावर सादर केला एरियर सिल्क डान्स

​उर्मिला कानेटकर कोठारेने चला हवा येऊ द्याच्या मंचावर सादर केला एरियर सिल्क डान्स

googlenewsNext
्मिला कानेटकर कोठारे ही एक चांगली अत्रिनेत्री असण्यासोबतच एक चांगली नर्तिकादेखील असल्याचे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. उर्मिला नवनवीन नृत्यप्रकाराचे धडे नेहमीच गिरवत असते. तिने नुकताच एरियर सिल्क हा नृत्यप्रकार शिकला. एरियर सिल्क शिकणारी उर्मिला ही पहिलीच मराठी अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये सुश्मिता सेनने या नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण घेतले आहे. सुश्मिताला आदिती देशपांडेंनी हा नृत्यप्रकार शिकवला आहे. त्याच आदितीकडून उर्मिलाने सिल्क या नृत्यप्रकाराचे धडे गिरवले आहेत. 
उर्मिलाने सिल्क हा नृत्यप्रकार नुकताच चला हवा येऊ द्याच्या मंचावर सादर केला. कोणत्याही कार्यक्रमात अथवा समारंभात सिल्क हा नृत्यप्रकार सादर करण्याची उर्मिलाची ही पहिलीच वेळ आहे. याविषयी उर्मिला सांगते, "मी सिल्क हा नृत्यप्रकार शिकून कित्येक दिवस झाले आहे. हा नृत्यप्रकारे कुठेतरी सादर करावा असे मला नेहमीच वाटत होते. पण मी एखाद्या चांगल्या संधीची वाट पाहात होती. एखाद्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर अथवा एखाद्या पुरस्कार सोहळ्यात आपण हे नृत्य सादर करावे असे मी ठरवले होते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात अनेकवेळा कलाकार आपल्यात असलेली कला सादर करतात. त्यामुळे मीदेखील याच प्लॅटफॉर्मवर माझा हा नृत्यप्रकार सादर करण्याचे ठरवले. मी करार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चला हवा येऊ द्याच्या मंचावर गेली असता मी हा नृत्यप्रकार सादर केला. चला हवा येऊ द्या हा आज सगळ्यात प्रसिद्ध कार्यक्रम आहे. त्यामुळे माझा नृत्यप्रकार सादर करण्यासाठी मला याशिवाय चांगला प्लॅटफॉर्म मिळाला नसता. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच माझ्या नृत्याचे कौतुक केले. माझ्या फॅन्सनादेखील माझा हा नृत्यप्रकार आवडेल याची मला खात्री आहे."

Web Title: Arari Silk Dance presented on the platform of Urmila Kanetkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.