Anupama Spoiler Alert: अनुपमा- अनुजच्या लग्नात आणखी नवं विघ्न, वाचा, ‘अनुपमा’ मालिकेत पुढे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 01:38 PM2022-05-10T13:38:54+5:302022-05-10T13:39:22+5:30

Anupama 10 May Episode: अनुपमा (Anupama) ही सध्या गाजत असलेली हिंदी मालिका. सध्या या मालिकेत काय सुरू आहे तर अनुपमा आणि अनुज यांची संगीत आणि मेहंदी सेरेमनी संपता संपत नाहीये.  दरवेळी असा काही ट्विस्ट येतो की, अनुपमा व अनुजच्या लग्नांच्या विधीत विघ्न पडतं.

Anupama hindi serial 10th May 2022 Written Episode Update | Anupama Spoiler Alert: अनुपमा- अनुजच्या लग्नात आणखी नवं विघ्न, वाचा, ‘अनुपमा’ मालिकेत पुढे काय होणार?

Anupama Spoiler Alert: अनुपमा- अनुजच्या लग्नात आणखी नवं विघ्न, वाचा, ‘अनुपमा’ मालिकेत पुढे काय होणार?

googlenewsNext

Anupama 10 May Episode: अनुपमा (Anupama) ही सध्या गाजत असलेली हिंदी मालिका. सध्या या मालिकेत काय सुरू आहे तर अनुपमा आणि अनुज यांची संगीत आणि मेहंदी सेरेमनी संपता संपत नाहीये.  दरवेळी असा काही ट्विस्ट येतो की, अनुपमा व अनुजच्या लग्नांच्या विधीत विघ्न पडतं. अर्थात इतकं काही होऊनही अनुज व अनुपमा मागे हटायला तयार नाहीत. मालिकेत आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की, वनराजचा जळफळाट होतोय. आपल्या मुलांची अनुजशी जवळीक बघून त्याचा संताप अनावर होतो आणि तो अनुजला शाह हाऊसमधून घेऊन बाहेर पडतो. अनुज मंडपात नाही म्हटल्यावर अनुपमाच्या जणू श्वासच थांबतो आणि ती संगीत सेरेमनी मध्येच थांबवते. आता या मालिकेत आणखी एक ड्रामा होताना दिसणार आहे.

वनराज अनुजला आपल्या मुलांपासून दूर राहण्याची तंबी देणार आहे. अनुजही वनराजला धमकी देताना दिसणार आहे. तू अनुपमाला थोडं जरी दुखावलंस तर मी तुझ्या मुलांना तुझ्यापासून हिसकावून घेईल, असं तो वनराजला बजावताना दिसेल. हे ऐकून वनराजचा पारा चढेल. इतकं सगळं धमकावणं झाल्यानंतर वनराज व अनुज घरी येतील. अनुजला डोळ्यांपुढे पाहून अनुपमाच्या जीवात जीव येईल.
अनुज आल्यानंतर संगीत सेरेमनी पुन्हा सुरु होईल. अर्थात ड्रामा इतक्यात संपणार नाही.

सेरेमनी रंगात आली असतानाच बापूजी चक्कर येऊन पडतील. बापूजी बेशुद्ध झाल्यावर पुन्हा सगळीकडे टेन्शन वाढेल. मग काय, संगीत सेरेमनी सोडून शाह कुटुंब रूग्णालयात पळेल. वनराजचा राग आणखी वाढेल आणि रागाच्या भरात तो अनुपमाला यासाठी जबाबदार ठरवेल. तुझ्याचमुळे बापूजींची ही अवस्था झालीये, असं म्हणत तो अनुपमाला नको ते बोलेल. इतकंच नाही तर शाह हाऊसमध्ये अनुपमाचं लग्न होऊ देणार नाही,असं बोलून पुन्हा एकदा टेन्शनमध्ये भर घालेल. 

आता हे वाचल्यानंतर अनुज व अनुपमाच्या लग्नाचं काय होणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर ते येणा-या एपिसोडमध्ये दिसेलच.

Web Title: Anupama hindi serial 10th May 2022 Written Episode Update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.