anu malik left singing reality show indian idol 11 after sexual harassment allegations by sona mohapatra | #MeToo : अनु मलिकने सोडला ‘इंडियन आयडल 11’ शो?
#MeToo : अनु मलिकने सोडला ‘इंडियन आयडल 11’ शो?

‘इंडियन आयडल 11’चा जज बनल्यापासून संगीतकार व गायक अनु मलिक वादात सापडला आहे. मीटू मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी त्याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी अनु मलिकने या आरोपांवर एक खुले पत्र लिहिले होते. पण ताजी बातमी खरी मानाल तर अनु मलिकने ‘इंडियन आयडल 11’ शो सोडण्याचे कळतेय. अर्थात अद्याप चॅनल व निर्मात्यांनी याबद्दल अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ई-टाईम्सशी बोलताना अनु मलिकने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मी कुठल्याही दबावापोटी नाही तर माझ्या मर्जीने ब्रेक घेतोय. मी स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे. मी शोमधून तीन आठवड्यांचा ब्रेक घेतोय आणि माझ्या वरचे सगळे आरोप पुसल्यानंतरच शोमध्ये परतेल, असे त्याने सांगितले.
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनु मलिकने ‘इंडियन आयडल 11’चे परिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला. पण शोमधील त्यांची जागा कोण घेणार हे मात्र अद्याप समजलेले नाही. अनु मलिकवरचा आरोपानंतर ‘इंडियन आयडल 11’ प्रसारित करणा-या सोनी टीव्हीला राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस बजावली होती.   

ही नोटीस महिला आयोगाच्या आफिशिअल ट्विटर अकाउंटवरही शेअर करण्यात आली होती.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून काढण्यात आलेल्या या नोटीसमध्ये गायिका सोना मोहपात्राच्या ट्वीटचा उल्लेख करण्यात आला आहे आणि चॅनेलकडून अनु मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे स्पष्टीकरण मागितले आहे. 2018 मध्ये बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा हिने पहिल्यांदा अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता. त्या 

वेळी अनु मलिक यांना इंडियन आयडॉल 10 सुद्धा अर्ध्यावरुनच सोडावा लागला होता. त्यानंतर गायिका नेहा भसीन आणि श्वेता पंडित यांनी सोनाला पाठिंबा देत अनु मलिक यांच्यावर अनेक आरोप लावले होते. या आरोपानंतरही ‘इंडियन आयडल 11’मध्ये अनु मलिक जज म्हणून परतला. यानंतर सोना मोहपात्राने पुन्हा एकदा त्याच्याविरोधात मोर्चा उघडला होता.

Web Title: anu malik left singing reality show indian idol 11 after sexual harassment allegations by sona mohapatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.