अण्णा नाईक परत येणार...तेही कोणत्याही रुपात, 'रात्रीस खेळ चाले ३'ची वाढली उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 06:06 PM2021-03-18T18:06:27+5:302021-03-18T18:06:55+5:30

रात्रीस खेळ चाले ३च्या नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांची या मालिकेची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Anna Naik to be back ... Anyway in Ratris Khel Chale season 3 | अण्णा नाईक परत येणार...तेही कोणत्याही रुपात, 'रात्रीस खेळ चाले ३'ची वाढली उत्सुकता

अण्णा नाईक परत येणार...तेही कोणत्याही रुपात, 'रात्रीस खेळ चाले ३'ची वाढली उत्सुकता

googlenewsNext

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची घोषणा झाल्यापासून ही मालिका कधीपासून सुरू होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यात अण्णा नाईक यांचा अवतार पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. 


रात्रीस खेळ चाले ३चा प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावर अधिकृत पेजवर रिलीज करण्यात आला आहे. हा प्रोमो शेअर करत लिहिले की, अण्णा नाईक परत येणार.... आता कोणत्याही रुपात ....२२ मार्चपासून रात्री ११ वा. 'रात्रीस खेळ चाले ३'.


या प्रोमोत दाखवण्यात आले आहे की, अण्णा नाईक कोणाला तरी सोबत घेऊन वाडा दाखवण्यासाठी येतात. ते त्या व्यक्तीला २०० वर्षे जुना वाडा असल्याचे सांगतात. तिथे आजी पणज्यांचे लग्न इथेच झाले आणि माझ्या पोरटोरांची लग्नदेखील इथेच झाली असे त्या गृहस्थांना सांगतात. आता तुम्हाला हा वाडा विकत घ्यायचा आहे तर येऊन एकदा बघा असे अण्णा त्या गृहस्थांना म्हणतात. आम्ही इकडे कोणी राहत नाही वाडा बंद असतो असे म्हणत अण्णा नाईक दरवाजाचा टाळा न खोलताच घरात शिरतात. ते कुठे गायब झाले म्हणून गृहस्थांचा थरकाप उडत असतानाच अण्णा नाईक दरवाजातून डोक बाहेर काढत येतात ना असं म्हणताना दिसत आहेत.


रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत.
रात्रीस खेळ चाले ३चा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता ही मालिका २२ मार्चपासून रात्री ११ वाजता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Web Title: Anna Naik to be back ... Anyway in Ratris Khel Chale season 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.