'तुझ्यात जीव रंगला' मालिका एका नव्या वळणावर आली आहे. प्रेक्षकांचा लाडका राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीची मालिकेतून एक्झिट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. या मालिकेचे कथानक आता दोन वर्षं पुढे गेले असून राणा दाचे निधन झाल्याचे त्याच्या घरातल्यांना वाटत आहे. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हार्दिकने मालिकेतून एक्झिट घेतल्यामुळे त्याचे फॅन्स देखील नाराज झाले आहेत. पण आता हार्दिकच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. या मालिकेत त्याचा आता एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


झी मराठी वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात अंजली राणाच्या आठवणीत व्याकुळ झाली आहे आणि राणाला परत ये असं म्हणताना दिसतेय. तर दुसरीकडे राणासारखाच दिसणारा राजाची दणक्यात एन्ट्री होताना पहायला मिळते आहे.


कुस्ती खेळणारा हार्दिक आता चक्क चोर बनला आहे. त्याचे नाव राजा राजगोंडा असून त्याला सगळे आर आर म्हणून ओळखतात. मारामारी करणारा जीन्स, टी-शर्ट आणि गॉगलमधील हार्दिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या टीमला खात्री आहे आणि विशेष म्हणजे नव्या लूकमध्ये हार्दिकच्या मिशीची स्टाईल देखील वेगळी आहे. 


'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका लोकप्रिय असून यातील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या या नवीन भूमिकेला देखील त्याच्या फॅन्सची पसंती मिळेल यात काहीच शंका नाही.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली आणि राणा दा यांच्या शिवाय बरकत, नंदिता, चंदे ही पात्रे देखील लोकप्रिय झाली आहेत. 


Web Title: Anjali was memorizing rana, Raja will be entry soon in Tujhyat Jeev Rangala serial
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.