गेल्या काही दिवसांपासून 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा नवा प्रोमो नुकताच इंस्टाग्रामवर प्रसारीत करण्यात आलाय. यात राणादाला मारहाण करून नदीत फेकलं जातं. त्यामुळं खरंच राणादा या मालिकेतून निरोप घेणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू झालीय. त्याता आता या मालिकेत अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधरने इंस्टाग्रामवर गुड बाय राणादा...तुझी सतत आठवण येईल असं म्हटलंय.  

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये धक्कादायक वळण आल्याचं झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या प्रोमोमधून पहायला मिळतंय. हा प्रोमो शेअर करून गुडबाय राणादा असंही लिहिण्यात आलंय.

या प्रोमोत राणादाला नंदिता वहिनीचा डाव समजतो. त्यात ती हा ठोकळा माझ्यात ताब्यात राहणार असे बोलत असते. हे राणादा ऐकतो आणि यापुढे तुमचं तोंडदेखील पाहणार नाही असं सांगून तिथून निघून जातो. 
त्यानंतर नंदिता वहिनी पाहिजे तेवढे किंमत देते पण हे काम झालं पाहिजे असं बोलते. त्यानंतर काही लोक राणादा मारतात आणि त्याला नदीत फेकून देतात. राणादाच्या शोधात आलेली अंजली राणादाला नदीत पडताना पाहते. राणादाचा मृत्यू होईल की तो बचावेल, हे मालिकेच्या आगामी भागातच स्पष्ट होईल. 


अक्षया देवधरने इंस्टाग्रामवर लिहिलं की, गुड बाय राणादा.... तुझी सतत आठवण येईल..... विशेष भाग, २१ जून २०१९ ला सायं ७:३० वाजता, तुझ्यात जीव रंगला! झी मराठीवर!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राणादा हा जख्मी होणार असून काही दिवसांसाठी तो मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. पण ही एक्झिट केवळ महिन्याभरासाठी असून तो या मालिकेत परतणार आहे. पण या मालिकेत राणाचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील खलनायिका नंदिती वहिनी सुधारणार असून ती आता सकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. 


Web Title: Anjali says, Rana ... you will always be reminded, Ranada exit from Tuzyat Jeev Rangala serial
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.