Anang Desai enters in Bhakharwadi | 'भाखरवडी'मध्‍ये अनंग देसाईंची एंट्री
'भाखरवडी'मध्‍ये अनंग देसाईंची एंट्री

ठळक मुद्देअभिनेता अनंग देसाईने ही भूमिका साकारली आहे

भाखरवडीच्‍या स्‍वादाप्रमाणे प्रेक्षकांना नात्‍यांमधील गोड-तिखट संबंधांना दाखवणारी सोनी सबवरील हलकीफुलकी विनोदी मालिका 'भाखरवडी' प्रेक्षकांसमोर काही रोमांचक वळणे घेऊन येण्‍यास सज्‍ज आहे. अभिषेक (अक्षय केळकर) आणि गायत्री (अक्षिता मुद्गल) यांची प्रेमकथा पुढे सरकत आहे. पण या नवीन पात्राच्‍या प्रवेशासह अण्‍णा (देवेन भोजानी) संकटात सापडले आहेत.

कथानकाला नवीन वळण देत 'भाखरवडी' मालिका एका मृत वृद्धाच्‍या भूमिकेला घेऊन येत आहे. अभिनेता अनंग देसाईने ही भूमिका साकारली आहे. अभिषेक व गायत्री यांच्‍या साखरपुड्याची उत्‍साहपूर्ण तयारी सुरू असताना अण्‍णा संकटात सापडले आहेत. अनंग देसाईने साकारलेली भूमिका वृद्ध माणूस मरणासन्‍न स्थितीत असताना गोखले बंधूची भाखरवडी खाण्‍याची शेवटची इच्‍छा प्रकट करतो. पण गोखले बंधूचे दुकान बंद असल्‍यामुळे त्‍याला गोखले बंधूच्‍या पॅकेजिंगमधून महेंद्रच्‍या दुकानामधील चायनीज भाखरवडी देऊन मूर्ख बनवले जाते. अण्‍णाला समजते की, वृद्ध माणूस त्‍याची शेवटची इच्‍छा पूर्ण न होता मृत्‍यू पावला आहे. अण्‍णाला भिती वाटू लागते की, या वृद्ध माणसाचा अतृप्‍त आत्‍मा त्‍याला त्रास देईल. अण्‍णा वृद्ध माणसाचा आत्‍मा घाबरवत असल्‍याची स्‍वप्‍ने पाहू लागतो.


मृत वृद्ध माणसाची भूमिका साकारणारे अनंग देसाई म्‍हणतात, ''मी 'भाखरवडी' टीमचा भाग होण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. या मालिकेतील प्रत्‍येकजण अत्‍यंत प्रतिभावान, मेहनती आहे आणि ते पडद्यावर अद्वितीय अभिनय साकारत आहेत. माझी भूमिका अत्‍यंत रोचक आहे. ही भूमिका एका वृद्ध माणसाची आहे, जो मरणासन्‍न स्थितीत असताना गोखले बंधूची भाखरवडी खाण्‍याची शेवटची इच्‍छा व्‍यक्‍त करतो. ही भूमिका अण्‍णाला पछाडणार आहे आणि त्‍यामधील विलक्षण गोष्‍टी निश्चित प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करतील.''

Web Title: Anang Desai enters in Bhakharwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.